Water Scarcity : पनवेलची पाणीचिंता वर्षभरात मिटणार

Water Crisis : पनवेल महापालिका, सिडको, जेएनपीए, एमएमआरडीए या संस्थांना व परिसराला एकूण २२८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ३१४ कोटी किमतीची वाढीव न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : पनवेल महापालिका, सिडको, जेएनपीए, एमएमआरडीए या संस्थांना व परिसराला एकूण २२८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ३१४ कोटी किमतीची वाढीव न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. यासाठी ३६ किलोमीटरपैकी २२.५ किमी लांबीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे.

वर्षभरात योजना पूर्णत्वास आणून पनवेलसह आजूबाजूच्या परिसराला आवश्यक तो पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असा विश्वास महाराष्‍ट्र जीवन प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Water Scarcity
Nanded Water Crisis : नांदेडमध्ये मध्यम, लघू प्रकल्पांनी गाठला तळ

पनवेल परिसराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दररोज पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली, करंजाडे, जेएनपीए परिसराचा समावेश आहे. वायाळ येथील पाताळगंगा नदीतून पाणी उपसून ते भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. तेथून पनवेल परिसरात आणले जाते. मात्र जलवाहिनीला गळती लागली आहे.

Water Scarcity
Mhaisal Water Crisis : ‘उटगी, निगडी तलावांत ‘म्हैसाळ’चे पाणी सोडा’

एमजेपीकडून सद्यस्थितीत पूर्ण क्षमतेने सरासरी १२० ते १२५ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु वाढती लोकसंख्या, वाढती रहिवासी बांधकामे आणि पर्यायाने वाढती पाण्याची मागणी त्यामुळे साहजिकच मागणीच्या तुलनेत पनवेल परिसराला कमी पाणी मिळते.

अडथळे दूर

एमएसआरडीसी व एमएमआरडीए यांच्याकडून नुकतेच कोन ते कोळखे, पळस्पे, पेठदरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे एमजेपीच्या जलवाहिनीचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरित तांत्रिक अडथळे दूर करून वर्षभरात पाणी योजना पूर्ण करून ग्राहकांना अखंडित पुरवठ्याचे उद्दिष्ट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com