Vitthal Mandir Agrowon
ॲग्रो विशेष

Vitthal Mandir : विठ्ठलाच्या दर्शनासाठी अधिकाऱ्याची वशिलेबाजी; वारकऱ्यांत संताप

Ashadhi Wari : पंढरपुरात आषाढी वारी अवघ्या पाच-सहा दिवसांवर आली आहे. या वारीसाठी लाखो वारकरी पालखी सोहळ्यासह पंढरपुरात येत आहेत.

Team Agrowon

Solapur News : पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाची आस ठेवून २०-२२ तास दर्शनरांगेत उभे राहून वारकरी दर्शन घेत आहेत. पण अशा परिस्थितीत थेट रांगेमध्ये घुसणारे मंत्री, आमदार, त्यांचे कार्यकर्ते, शासकीय अधिकारी आणि मंदिर समिती सदस्यांचे वशिल्याचे दर्शनार्थी पाहून वारकऱ्यांचा संताप आधीच अनावर झाला असताना, आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या एका अधिकाऱ्याच्या परिवारासाठी तेही ऐन आषाढी एकादशी दिवशी दर्शनाची सोय करावी, असे पत्र प्रशासनाला पाठवले आहे. त्यामुळे या वशिल्याच्या तट्टूंमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पंढरपुरात आषाढी वारी अवघ्या पाच-सहा दिवसांवर आली आहे. या वारीसाठी लाखो वारकरी पालखी सोहळ्यासह पंढरपुरात येत आहेत. पण सरकारच्याच काही घटकांनी मांडलेल्या उच्छादामुळे वारकरी मात्र पुरते हैराण झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मंत्री संदीपान भुमरे यांनी ५० कार्यकर्त्यांना घेऊन घुसखोरी करत व्हीआयपी दर्शन घेतल्याची घटना ताजी असतानाच, आता उद्योगमंत्री उदय सावंत यांनी ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे १७ जुलैला आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या व्हीआयपी दर्शनासाठी पत्र पाठवले आहे.

मंदिर समितीच्या सदस्यांच्या वतीने दररोज वैयक्तिक लाभाच्या आणि समितीच्या देणगीदारांना व्हीआयपी दर्शन घडविले जात आहे, परंतु काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून देखील रांगेत घुसखोरी करून व्हीआयपी भाविकांना दर्शन दिले जात आहे, या प्रकारावरून वारकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT