Budget 2024 PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

Budget 2024 PM Kisan : निर्मला सितारामन यांच्या पेटाऱ्यातून शेतकऱ्यांना काय मिळणार?

Loksabha Election 2024 : २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकप्रिय घोषणा केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

sandeep Shirguppe

Central Government Budget 2024 : केंद्र सरकारकडून आज (दि.१) अवघ्या काही तासांत या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम बजेट सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यासह राज्य अर्थमंत्र्याकडून लोकसभा डोळ्यासमोर ठेवून विविध घोषणा होण्याची शक्यता आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या पेटाऱ्यातून काय काय बाहेर काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शेतकऱ्यांना दरवर्षी पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीत दोन हजार रुपयांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मागच्या ६ वर्षांपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळत आहे. अंतरिम अर्थसंकल्प असल्याने फार मोठ्या घोषणा केल्या जाणार नसल्याचा अंदाज असला तरी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकप्रिय घोषणा केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या होत्या.

त्यामुळे याहीवेळा सरकार तो मोह टाळणार नाही, असे मानले जात आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये सरकारकडून प्राप्तीकर सूट मर्यादा वाढविण्यात आली होती, तर शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्था मागील वर्षी हिवाळी अधिवेशनावेळी संसद भवनात घुसखोरीचा प्रकार घडला होता.

या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यान संसद भवन परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घुसखोरीच्या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली आहे. साध्या वेशातील गुप्तचर ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

असे होण्याचा अंदाज

'पीएम किसान सन्मान योजने' अंतर्गत सध्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये इतका निधी दिला जातो. हा निधी आठ हजार रुपयांपर्यंत वाढविला जाण्याची, तर महिला शेतकऱ्यांसाठी हा निधी बारा हजार रुपयांपर्यंत वाढविला जाण्याची चर्चा आहे.

प्राप्तीकर कायद्याच्या कलम ८० सी नुसार सध्या दीड लाख रुपयांची कर सूट मिळते. हे प्रमाण यावेळी अडीच लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य विमा प्रिमियमवर ८० डी अंतर्गत दिली जात असलेली २५ हजार रुपयांची सूट ५० हजारपर्यंत वाढू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Floods: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्नाटकात पीक नुकसानीची प्रति हेक्टर ८,५०० रुपये अतिरिक्त भरपाई

Sugarcane Farming: ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी 

Women Empowerment: सामाजिक समावेशकतेतूनच स्त्रीशक्तीचा जागर

Market Committee: बाजार समित्यांचे नसते उद्योग

Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा

SCROLL FOR NEXT