Grape Export : राज्यातून द्राक्षाची निर्यात संथगतीने

Grape Season : आतापर्यंत १७ हजार टन निर्यात; ४३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी
Grape Export
Grape ExportAgrowon
Published on
Updated on

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sangali News : सांगली ः यंदाच्या द्राक्ष हंगामावर नैसर्गिक संकट ओढावले. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत राज्यातील ४३ हजार १५६ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. राज्यातून द्राक्ष निर्यातीस प्रारंभ झाला असून आजअखेर राज्यातून १७ हजार ४३३ टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. सद्यःस्थितीत निर्यात संथ गतीने सुरू असून फेब्रुवारीच्या मध्यापासून द्राक्ष निर्यातीला गती येईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

राज्यात द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासूनच संकटाची मालिका सुरू झाली. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकऱ्यांनी निर्यातक्षम बागा वाचवल्या. यंदा राज्यातून ४३ हजार १५६ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणी केली आहे. राज्यातून बांगलादेश, आखाती देशात नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांपासून द्राक्षाची निर्यात सुरू होते. त्यानंतर जानेवारी महिन्यापासून युरोपियन देशात द्राक्ष निर्यात होण्यास प्रारंभ होतो.

Grape Export
Grape Export : राज्यातून द्राक्ष निर्यात सुरू

यावर्षीही जानेवारी महिन्यापासून युरोपियन देशात द्राक्षाची निर्यात सुरू झाली आहे.
राज्यातून द्राक्षाची १३०५ कंटनेरमधून १७ हजार ४३३ द्राक्षाची निर्यात झाली आहे. मात्र, सुएझ कालव्यामार्गे निर्यात करण्यासाठीची वाहतूक बंद असल्याने निर्यातीत फारशी गती नाही. त्यामुळे शेतकरी आणि निर्यातदार द्राक्ष निर्यात करण्यासाठी सावध पावले उचलत आहेत. फेब्रुवारी महिन्‍याच्या दुसऱ्या आठवड्यापासून निर्यातीस गती येईल. द्राक्ष निर्यात सुरू झाली असून पांढऱ्या द्राक्षाला प्रती किलोस ७० ते ९५ रुपये तर रंगीत द्राक्षांना १०० रुपयांच्या पुढे असा दर मिळत आहे.

द्राक्ष निर्यातीसाठी ४३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी
महाराष्ट्र आणि कर्नाटकातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीसाठी ४३,१६७ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील ४३ हजार १५६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून कर्नाटकातील ११ शेतकरी द्राक्ष निर्यातीसाठी पुढे आले आहेत. सध्या महाराष्ट्रातून नेदरलँड/हॉलंड, रोमानिया, नेदरलँड्स अँटिल्स, स्वीडन, स्विझर्लंड या देशात द्राक्षा निर्यात सुरू झाली आहे.

राज्यातील निर्यात दृष्टिक्षेपात
देश.... कंटेनर...टन
नेदरलँड...१२९९...१७३५६.४०१
रोमानिया...२...२५.८७०
नेदरलँड्स अँटिल्स...२...२५.४८०
स्वीडन...१...१३.०००
स्विझर्लंड...१...१२.४८०
एकूण..१३०५...१७४३३.२३१


यंदाची द्राक्ष निर्यात सुरू झाली आहे. हंगामाच्या प्रारंभी द्राक्षाला प्रती किलोस ८५ ते ९५ रुपये असा दर आहे. हंगामाच्या प्रारंभी दर अपेक्षित मिळत असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
- काका पाटील,
द्राक्ष उत्पादक शेतकरी, पळशी, ता. खानापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com