Market System : हरितक्रांती झाली; मात्र बाजारव्यवस्था ‘जैसे थे’

The Green Revolution : निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांचे प्रतिपादन
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे ः देशात हरितक्रांती झाली; मात्र शेतमाल बाजाराची व्यवस्था ‘जैसे थे’ राहिली आहे. सध्याच्या बाजार समित्यांची प्रणाली त्रयस्तांच्या हातात आहे. या व्यवस्थेत शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याची संधी नाही, अशी खंत राज्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांनी व्यक्त केली.

पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता. ३१) आयोजित केलेल्या डॉ. एम. एस. स्वामिनाथन व्याख्यानमालेत ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष व यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, उपाध्यक्ष प्रा. डॉ. जनार्दन कदम तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर होते.

या वेळी सुभाष पाटणे यांना कृषिसन्मान तर डॉ. बुधाजीराव मुळीक यांना कृषी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. गुणवंत विद्यार्थी श्रीराज कोलते, कु. सृष्टी काकडे, ललित आव्हाड यांचाही गौरव करण्यात आला.

Cotton Market
Sugarcane FRP : पहिल्या हप्त्याचा तिढा ‘जैसे थे’च

सरंगी म्हणाले की, दुष्काळ आणि भूक या समस्येत गुरफटलेल्या भारताला डॉ. स्वामिनाथन यांच्यामुळेच हरितक्रांती बघता आली. त्यामुळेच गेल्या हंगामात देशाचे अन्नधान्य उत्पादन ३२९ दशलक्ष टनांपर्यंत पोचले. मात्र, आपली लागवडयोग्य जमीन ५० टक्के आहे; तर चीनमध्ये हेच क्षेत्र अवघे १० टक्के आहे.

भारतीय लागवडयोग्य जमिनीपैकी ५० टक्के क्षेत्राला सिंचन शक्य आहे. परंतु, हेच प्रमाण चीनमध्ये अवघे ४१ टक्के आहे. असे असूनही चीन त्याच्या अफाट लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य पिकवतो आहे. हे केवळ उच्च उत्पादकतेमुळे शक्य आहे.

देशाचे फळे व भाजीपाला उत्पादन ३२० दशलक्ष टनांपर्यंत गेले आहे. परंतु, यात प्रक्रिया केवळ दोन टक्के मालावर आणि निर्यातदेखील दोन टक्क्यांच्या पुढे नसल्याचे श्री. सरंगी यांनी निदर्शनास आणले.

‘‘एकटा दक्षिण आफ्रिका त्याच्या एकूण शेतीमालापैकी २४ टक्के निर्यात करतो; तर ६५ टक्के मालावर प्रक्रिया करतो. त्यामुळे बाजार व्यवस्थेतील सुधारणा, प्रक्रिया व निर्यातीवर भर, उच्च तंत्रज्ञानाचा वापर या मार्गाने देशाच्या कृषी व्यवस्थेला न्यावे लागेल.’’ असेही ते म्हणाले.


शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे नाही
यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड या वेळी म्हणाले की, जगात सर्वाधिक स्टार्टअप्स् भारतात उघडत असून यात कृषी पदवीधरांनी धडाडीने उतरायला हवे. देशात एकीकडे विक्रमी अन्नधान्याचे उत्पादन होत आहे. परंतु, तरीही शेतीची अवस्था वाईट आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे नसल्यास शेतीला चांगली दिशा द्यावी लागेल. अर्थात, त्यासाठी आता कृषी पदवीधरांनाच पुढाकार घ्यायला हवा. कृषी उद्योग व व्यवसायात उतरावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com