Dana Cyclone Agrowon
ॲग्रो विशेष

Cyclone Dana : डाना चक्रीवादळाचा कहर! ओडिशात मुसळधार पाऊस, झाडे पडली, रस्ते खचले; ओडिशात एक, बंगालमध्ये दोघांचा मृत्यू

Cyclone Dana Update : डाना चक्रीवादळाच्या धोक्यामुळे, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. दोन्ही राज्यातील काही जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. तर विमान सेवेसह ५०० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : चक्रीवादळ 'डाना' शुक्रवारी (ता.२५ दुपारनंतर ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले. यावेळी चक्रीवादळाचा प्रभाव पश्चिम बंगालपासून ओडिशापर्यंत दिसून येत आला. दोन्ही राज्यांत मुसळधार पावसासह वेगवान वारे वाहत होते. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते शुक्रवारी वाऱ्याचा वेग १०० ते १२० प्रती तास किलोमीटर वेगाने वाहत होते. यामुळे दोन्ही राज्यात झाडे उन्मळून पडण्यासाठी सखल भागात पावसाचे पाणी शिरण्यासह जिवीतहानी झाली. ओडिशात एका महिलेचा आणि बंगालमध्ये दोघांचा मृत्यू झाला.

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, डाना चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १६ जिल्ह्यांमध्ये पूर येण्याचा अंदाज याच्या आधीच हवामान विभागाने वर्तवले होते. यावरून मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी, सरकार कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार असून पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आयुक्त कार्यालयात तयार करण्यात आलेल्या विशेष मदत नियंत्रण कक्षाला त्यांनी भेट दिली.

सुमारे ६ लाख लोकांचे स्थलांतर

यावेळी माझी यांनी डाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ५ लाख ८४ हजार ८८८ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून शुक्रवारी सकाळपर्यंत ही संख्या ६ लाखांपेक्षा जास्त असू शकते, असेही माहिती मांझी यांनी दिली. तसेच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आधीच ४ हजार ४३१ गर्भवती महिलांना मदत केंद्रात हलवण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ६०० महिलांनी मुलांना जन्म दिला. तर येथील केंद्रपारा जिल्ह्यातील निवारा केंद्रात एका ८२ वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

रेल्वे, विमान सेवा पुन्हा सुरू

दरम्यान बिझनेस लाईनच्या वृत्तानुसार, भुवनेश्वरच्या बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे देखील पुन्हा सुरू करण्यात आली. सकाळी ९ च्या सुमारास पहिल्या विमानाचे उड्डाण झाल्याचे विमानतळ संचालक प्रसन्न प्रधान यांनी सांगितले. तसेच पूर्व कोस्ट रेल्वे विभागाने सांगितले की, त्याच्या अधिकारक्षेत्रात आधी रद्द केलेल्या गाड्या वगळून वेळापत्रकानुसार ट्रेन इतर रेल्वे सुरू करण्यात आल्या. पण रेल्वेने सुमारे २०३ गाड्या रद्द केल्या होत्या.

पश्चिम बंगालमध्ये एकाचा मृत्यू

डाना चक्रीवादळामुळे कोलकातामधील अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले होते. अलिपूर येथील प्रादेशिक हवामान कार्यालयानुसार, कोलकात्यात शुक्रवारी (ता.२५) सकाळी ११.३० वाजेपर्यंत २४ तासांत १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. यामुळे येथे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले. तर परगणा येथील पाथरप्रतिमा येथे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.

बंगालमधील उड्डाण पुन्हे सुरू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या किनारपट्टीवर दाना चक्रीवादळ आल्यानंतर पश्चिम बंगालमधील कोलकाता विमानतळाने शुक्रवारी सकाळी ८ वाजता उड्डाण सुरू केले. तसेच, चक्रीवादळ दानामुळे रद्द करण्यात आलेल्या पूर्व रेल्वेच्या सियालदह विभागाच्या दक्षिणेकडील रेल्वे सेवा सकाळी १० वाजता पुन्हा सुरू झाल्या.

झारखंडच्या अनेक भागात पाऊस

डाना चक्रीवादळामुळे शुक्रवारी झारखंडच्या अनेक भागात पाऊस पडला, अशी माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने दिली. पश्चिम सिंगभूम, सरायकेला-खरसावन आणि पूर्व सिंगभूम जिल्ह्यांसह कोल्हान भागात गुरुवारी रात्रीपासून हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरण असून अधूनमधून रिमझिम पाऊस पडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT