Dana Cyclone : `डाणा` चक्रीवादळाचा काही जिल्ह्यांना फटका; ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला आज मध्यरात्री धडकणार

Cyclone Update : चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले.
Dana Cyclone
Dana CycloneAgrowon
Published on
Updated on

Pune News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अतितीव्र डाणा चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्याआधीच जोरदार वारे वाहत असून पाऊस पडत आहे. चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. 

वायव्य बंगालच्या उपसागरात ओडिशातील पारादीपपासून आग्नेयला २१० किलोमीटर आणि पश्चिम बंगालच्या सागर बेटापासून ३१० किलोमीटरवर डाणा अतितीव्र चक्रीवादळ आहे. हे चक्रीवादळ उत्तर ईशान्येकडे सरकत आहे. हे चक्रीवादळ उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर पुरी आणि सागर बेटाच्या जवळ भितारकणिका आणि धमारा दरम्यान किमानाऱ्यावर आज मध्य रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत धडकण्याची शक्यता आहे. यावेळी १०० ते ११० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. 

Dana Cyclone
Dana Cyclone : बंगालच्या उपसागरात ‘डाना’ चक्रीवादळ

चक्रीवादळाच्या आगमनापूर्वी ओडिशातील समुद्राने उग्र रूप धारण केले आहे. ओडिशा सरकारने १४ जिल्ह्यांतील ३ हजार गावांमधून १० लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर केले आहे. तसेच बंगालमध्ये देखील सुमारे १ लाख ३० हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर अन्न, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत.

Dana Cyclone
Cyclone Dana : ‘डाना’ चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगालमधील लाखो लोकांचे स्थलांतर; विमान, रेल्वेसेवा रद्द; शाळाही बंद

ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आले आहे. रेल्वे गाड्याही रद्दी करण्यात आल्या आहेत. 

राज्यात पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. मात्र शनिवारी विदर्भातील गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर रविवारी विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा विजा आणि ढगांच्या गडगडाटासह येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात काही जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com