Dana Cyclone
Dana CycloneAgrowon

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Cyclone Update : बंगालच्या उपसागरातील ‘डाना’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. ही प्रणाली ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनाऱ्याकडे झेपावत असल्याने या राज्यांच्या किनारपट्टीला तडाखा बसणार आहे.
Published on

Pune News : बंगालच्या उपसागरातील ‘डाना’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. ही प्रणाली ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनाऱ्याकडे झेपावत असल्याने या राज्यांच्या किनारपट्टीला तडाखा बसणार आहे.

आज (ता. २५) सकाळपर्यंत हे चक्रीवादळ पुरी आणि सागर बेटांदरम्यान किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. जमिनीवर येताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Dana Cyclone
Dana Cyclone : बंगालच्या उपसागरात ‘डाना’ चक्रीवादळ

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील मंगळवारी (ता. २२) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली होती. ही प्रणाली वायव्य दिशेकडे सरकताना तीव्र झाली असून, बुधवारी (ता. २३) चक्रीवादळात रूपांतर होऊन, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे सरकू लागली आहे. आणखी तीव्र झालेले हे चक्रीवादळ ओडिशाच्या परादीपपासून २१० किलोमीटर, धामरापासून २४० किलोमीटर आग्नेयेकडे, तर पश्चिम बंगालच्या सागर बेटापासून ३१० किलोमीटर दक्षिणेकडे होती.

Dana Cyclone
Cyclone Dana : ‘डाना’ चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगालमधील लाखो लोकांचे स्थलांतर; विमान, रेल्वेसेवा रद्द; शाळाही बंद

वायव्य दिशेकडे सरकत असलेले ‘डाना’ चक्रीवादळ आज (ता. २५) सकाळी ओडिशाच्या पुरी आणि सागर बेटाजवळ असलेल्या धामरा आणि भितरकनिका जवळ जमिनीवर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल किनाऱ्यालगत ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच १ ते २ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जमिनीवर आल्यानंतर ही प्रणाली निवळण्याची शक्यता आहे.

खबरदारी म्हणून मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com