Bajari Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Sowing : खानदेशात बाजरी पेरणी पूर्ण; लागवडीचे क्षेत्र स्थिर

Bajari Production : खानदेशात बाजरी पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा सुरवातीला पेरणीला फारसा प्रतिसाद दिसत नव्हता.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात बाजरी पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा सुरवातीला पेरणीला फारसा प्रतिसाद दिसत नव्हता. परंतु जानेवारीनंतर पेरणी गतीने झाली आहे. पेरणी या आठवड्यातही काही भागात झाली आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आगाप पेरणीला सुरवात झाली. यंदा क्षेत्र स्थिर राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. नेमके आकडे अजून समोर आलेले नाहीत, परंतु यंदाची पेरणी खानदेशात सात ते साडेसात हजार हेक्टरवर होईल, अशी स्थिती आहे.

अनेक शेतकऱ्यांनी कांदेबाग केळीची काढणी 90 टक्के झालेल्या बागेतही पेरणी केली आहे. तापी, गिरणा, अनेर नदीच्या क्षेत्रात बेवडसाठी बाजरीची पेरणी शेतकरी करतात. बाजरी पिकाचे बेवड केळी किंवा पुढे कापूस पिकासाठी लाभदायी मानले जाते.

बाजरी अधिक थंडीत पेरू नये, असे शेतकरी म्हणतात. परंतु यंदा थंडी हवी तशी नव्हती. यामुळे शेतकरी आगाप पेरणी करण्याचे नियोजन करीत होते. पेरणी मात्र सुरवातीला कमी झाली. जानेवारीनंतर पेरणी अधिक झाली आहे. अनेकदा खानदेशात डिसेंबरच्या मध्यात पेरणी केली जाते.

यंदाही पेरणी 15 डिसेंबरनंतर सुरू होईल, असे दिसत होते. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा व साक्री हे तालुके बाजरीसाठी प्रसिद्ध आहेत. जळगावमधील चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, भडगाव, जामनेर. धरणगाव व चोपडा भागात बाजरीचे क्षेत्र अधिक असते. धुळ्यातील शिंदखेडा तालुका बाजरीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात खरीप व रब्बीतही अनेक शेतकरी बाजरीची पेरणी करतात.

कांद्याऐवजी बाजरी

अनेक शेतकऱ्यांनी यंदा कांदा, मका पिकाऐवजी बाजरी पेरणीचे नियोजन केले. काहींनी मका, कांद्याची लागवड कमी करून उर्वरित क्षेत्रात बाजरी पेरणीचे नियोजन केले आहे. यामुळे बाजरीच्या क्षेत्रात घट झालेली नाही.

यंदा सुमारे साडेसात ते आठ हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी राहील. मागील हंगामात सुमारे साडेसात हजार हेक्टरवर बाजरी होती. जळगाव जिल्ह्यात तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HSC Result Online 2026 : बारावीचा निकाल ८९.७९ टक्के; यंदाही निकालात मुलींनीच मारली बाजी

Paddy Prices Drop: मळणीच्या तोंडावर ३०० रुपयांनी दरात घट

Women Farmers Policy: ... शेती धोरणात ‘ती’ कोठेच नाही

Highest Crop Insurance Claim: वस्तुनिष्ठ कापणी प्रयोगांमुळे राज्यात सर्वाधिक पीकविमा

Zero Tillage: शून्य मशागत खरंच फायदेशीर ठरते का?

SCROLL FOR NEXT