Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Dairy : दूध दर निश्‍चितीचा खासगी डेअरींना फायदा

Milk Rate News : आता केवळ ३२ ते ३३ रुपये दराने दूध उचल होत असल्याने उत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.

Team Agrowon

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यात शासकीय दूध खरेदी होत नसल्याने उत्पादित होणारे बहुतांश दूध खासगी डेअरींना विकले जाते. गेल्या काळात शासनाने ३.५, ८.५ एसएनएफला ३४ रुपयांच्या आत भाव देऊ नये, असे आदेश काढले.

या आदेशांचा उलटा फायदा दूध खरेदी करणाऱ्या डेअरींनी उचलला. ३६ रुपयांवर दूध खरेदी करणाऱ्या डेअरींनी गेल्या १० दिवसांत आणखी दोनवेळा दर कमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आता केवळ ३२ ते ३३ रुपये दराने दूध उचल होत असल्याने उत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या जिल्ह्यात सध्या ६० ते ७० हजार लिटर दूध जळगाव, नगर व इतर जिल्ह्यांतील डेअरींकडून उचलले जाते. यासाठी ठिकठिकाणी संकलन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. बुलडाणा जिल्ह्यात एकेकाळी शासकीय दुग्ध व्यवसायाला भरभराट होती. शासकीय संकलन पार रसातळाला गेले. यामुळे जिल्ह्यातील सर्व दुग्ध उत्पादकांना खासगी डेअरींचा आश्रय घ्यावा लागत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांआधी ३.५, ८.५ यासाठी दुधाचा दर ३६ ते ३७ रुपये प्रतिलिटर चुकवला जात होता. दोन महिन्यांपूर्वी शासनाने दुधाचा दर ३४ रुपयांच्या खाली दिल्यास कारवाईचा आदेश काढला. यामुळे डेअरींनी पहिला फायदा उचलला.

दोन ते तीन रुपयांनी दर कमी करून आदेशाच्या बरोबरीने त्यांचे दर आणले. यामुळे शेतकऱ्यांना तेंव्हा २ ते ३ रुपयांचा पहिला फटका बसायला लागला. नंतर आता गेल्या १० दिवसांत पुन्हा दर खाली आणण्यात आले.

आता ३२ ते ३३ रुपयांचा प्रतिलिटर दर दिल्या जात आहे. दुसरीकडे पशुखाद्याची ५० किलो वजनाची बॅग १६५० वरून १८५० रुपये झाली. सध्या केवळ मदर डेअरीचा दर शासकीय आदेशाच्या बरोबरीने आहे. मात्र, ही डेअरीसुद्धा आता किती दिवस हा दर देईल या बाबत दूध उत्पादकच साशंकता व्यक्त करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Ethanol Rate : साखर, इथेनॉलच्या दरवाढीस अनुकूलता

Maharashtra Rain : तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता कायम

Sheep Farming : फिरस्त्या मेंढपाळीस हवे प्रोत्साहन

Rural Issues : रेवड्या नको, हवा रास्त भाव

Sugarcane Fire Issue : ऊस जळण्याच्या घटनांमुळे शेतकरी धास्तावले

SCROLL FOR NEXT