Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Production : सिन्नर तालुक्यात दूध उत्पादन २० टक्क्यांनी घटले

Milk Rate : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा असलेला दूध व्यवसाय दुष्काळाच्या झळा आणि उन्हाच्या वाढत्या तडाख्याने अडचणीत येऊ पाहत आहे.

Team Agrowon

अजित देसाई

Sinnar News : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा असलेला दूध व्यवसाय दुष्काळाच्या झळा आणि उन्हाच्या वाढत्या तडाख्याने अडचणीत येऊ पाहत आहे. गेल्या हंगामात पावसाने सर्वच ठिकाणी पाठ फिरवल्यामुळे निर्माण झालेली चारा व पाणीटंचाई, पशुखाद्याच्या वाढत्या किमती यामुळे पशुधन सांभाळण्याची कसरत दूध उत्पादक शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

दुष्काळी परिस्थितीशी झगडत दूध व्यवसाय भरभराटीला आणणाऱ्या सिन्नर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच सरासरी दूध उत्पादनात २० टक्के घट येऊ लागली आहे गेला पावसाळा वरूण राजा रुसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कळीत झाले.

शेतीचे उत्पन्न नाही, दारासमोर बांधलेल्या पशुधनास जगवण्यासाठी चारा देखील विकत घेण्याची वेळ बळीराजावर ओढवली. त्यात पुन्हा यंदाचा उन्हाळा असह्य असण्याचे संकेत फेब्रुवारीपासूनच मिळू लागले. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती, चारा व पाण्याची टंचाई यामुळे आश्वासक असणारा दूध व्यवसाय दुधाच्या घसरत्या दरामुळे परवडेनासा झाला आहे.

समोर उभ्या टाकलेल्या अस्मानी संकटामुळे दूध उत्पादनात देखील घट येऊ लागली आहे. नैसर्गिक परिस्थिती अनुकूल होईपर्यंत म्हणजे येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ही परिस्थिती कायम राहील, असा अंदाज आहे. दूध उत्पादन (Milk Production) घटन्यामागे वाढते ऊन, चारा व पाणीटंचाई या नैसर्गिक कारणांसोबतच पशुखाद्याचे वाढणारे दर देखील कारणीभूत आहेत.

चारा व पाणी विकत घेऊन जनावरांचे पालन करावे लागत आहे. हिरवा चारा दुरापास्त झाला असून पशुखाद्याच्या किमतींमध्ये देखील मोठी वाढ झाल्यामुळे बहुसंख्य दूध उत्पादक शेतकरी फक्त जनावरे जगवण्याला प्राधान्य देत आहेत. दूध दरात (Milk Price) सातत्याने होणारी घसरण देखील दूध उत्पादन घटविण्यास कारणीभूत ठरली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT