Milk Subsidy : दूध अनुदान पंचवीस रुपये दराला मिळणार

Milk Rate : दुधाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
Milk Subsidy
Milk SubsidyAgrowon
Published on
Updated on

Nagar News : दुधाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर मिळणे बंधनकारक होते. मात्र आता ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणप्रत असलेल्या दुधाला २७ रुपयांऐवजी २५ रुपये दर मिळालेल्या दुधाला अनुदान दिले जाणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चर्चेनंतर शुक्रवारी (ता. १५) कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने तसा आदेश काढला आहे. मात्र याआधी २७ रुपये दर मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे.

Milk Subsidy
Milk Subsidy : दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान जमा

राज्यात दूध दराचा प्रश्न सतत चर्चेत असतो. दोन वर्षांत विविध अडचणींवर मात करत दूध व्यवसाय जपणाऱ्या शेतकऱ्यांना आठ-नऊ महिन्यांपूर्वी दर चांगला मिळू लागला. मात्र चार महिन्यानंतर पुन्हा दुधाच्या दरात घसरण झाली.

३९ रुपये मिळणारा दर २९-३० रुपये प्रतिलिटरवर आला. सरकारने दूध दराच्या अभ्यासाबाबत समिती नियुक्ती करून आणि प्रतिलिटर ३४ रुपये दर देण्याची समितीने शिफारस करूनही दरवाढ झाली नाही. त्यामुळे सरकारने अखेर प्रतिलिटरला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देताना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ या गुणप्रतीकरिता २७ रुपये प्रतिलिटर दराने संबंधित शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर खरेदीदार दूधसंघ, दूध प्रकल्पाने ‘डिबिटी’द्वारे वर्ग केले असावे, असा निकष लावला.

Milk Subsidy
Milk Subsidy : दूध संस्थांनाही मोबदला मिळावा

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दूध अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. आता २७ ऐवजी २५ रुपये प्रतिलिटर दर मिळालेल्या गाईच्या दुधाला शेतकऱ्यांना ५ रुपये अनुदान मिळणार आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या दुधाला ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ या गुणप्रत लागत नसल्याने अपेक्षित दर मिळाला नाही. राज्यात गाईचे साधारणपणे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे संकलन होत आहे. अलीकडे दुधाच्या संकलनातही सातत्याने आकडे कमी-जास्त होत आहेत.

मुदतवाढीबाबत उल्लेख नाही

अकरा जानेवारीपासून सुरू केलेली ही योजना १० फेब्रुवारीपर्यंत होती. त्यानंतर त्यात मुदतवाढ करून ती १० मार्चपर्यंत करण्यात आली. आता २७ ऐवजी २५ रुपये दराचा निकष १५ मार्च रोजी करण्यात आला आहे. नव्याने काढण्यात आलेल्या आदेशात मात्र अनुदान देण्याबाबतच्या मुदतवाढीचा उल्लेख नाही.

दुधाला पुरेसा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र दोन महिन्यानंतरही अनुदान मिळाले नाही. मुळात ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला दुधाला २७ रुपये दरच मिळत नाही. सध्या २५ रुपये दर मिळत आहे. २५ रुपये दराला अनुदान देण्याचा आदेश आला असला तरी त्याबाबत संभ्रम आहे.
- प्रताप काळे, दूध उत्पादक, सारोळा कासार, ता. जि. नगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com