Agriculture Employment Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal society Migration : समूह शेतीमुळे थांबले आदिवासींचे स्‍थलांतर

Team Agrowon

Mangaon News : मानगाव तालुक्‍यात दुर्गम भाग मोठा असल्‍याने रोजगारासाठी स्‍थलांतराचे प्रमाण अधिक आहे. बांधकाम क्षेत्र, कोळसा खाण, वीटभट्टी, ऊसतोडीसाठी आदिवासी समाज परजिल्‍ह्यात, परराज्‍यात स्‍थलांतरित होतो. हे स्‍थलांतर थांबवण्यासाठी तसेच मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी माणगाव, तळा, म्हसळा तालुक्यामध्ये सर्वविकास दीप संस्था कार्यरत आहे. संस्थेने आतापर्यंत ६७ बचत गटांची स्थापना केली. याशिवाय समूह शेती तसेच शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी संस्‍थेकडून ग्रामीण भागात प्रयोग केले जात आहेत.

वन जमिनीवरील मंजूर दावे प्राप्त झाल्यानंतर एकूण १२ आदिवासी वाड्यांवरील एकूण २४ एकर क्षेत्रात नाचणी, बांबू, फळबाग लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर २०११ पासून २७ बचतगटांना ५० टक्के तत्त्वावर शेळीपालन करण्यास प्रोत्साहन दिले आहे. ११ बचत गट आज ३२ ते ३५ एकर क्षेत्रावर कारली, शिराळी, कलिंगड व मिश्र भाजीपाला पिके तसेच कडधान्य पिके घेत असून यात ३७० महिला सहभागी आहेत. शेतीबरोबरच शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही संस्‍थेचे प्रयत्‍न सुरू आहेत. उत्पादित माल स्‍थानिक बाजारासह वाशीतील कृषी उत्‍पन्न बाजार समितीतही पाठवला जातो. विशेष करून व्यापारीवर्ग शेतात येऊन शेतकऱ्यांच्या

समक्ष भाजीपाल्‍याचे वजन करून ते गाडीत भरतात. व्यवहार पारदर्शक होत आहे.

वर्षाकाठी भाजीपाला पिकविणाऱ्या एका कुटुंबास दोन ते सव्वा दोन लाख रुपये नफा

होतो. यावर आदिवासींचा उदरनिर्वाह चालत असल्‍याने त्‍यांचे स्‍थलांतर थांबले आहे.

जोडव्यवसायासाठी प्रोत्‍साहन

माणगावसारख्या शहरात तसेच आजूबाजूच्या गावात दर बुधवार व रविवारी लागणारे बोकडाचे मटण हे चाकण तसेच इतर ठिकाणांहून येते, परंतु स्‍थानिक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन सुरू केले असून बाजारभाव व विक्रीची हमी मिळू लागल्‍याने त्‍यांच्या उत्‍पन्नात वाढ झाली आहे. शेतीबरोबरच शेळीपालनासाठीही प्रोत्‍साहन देण्यात आले असून माणगाव तालुक्‍यात ४६७ शेळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

स्‍थानिकांना रोजगाराच्या संधी

कृषी विभागामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना बी-बियाणे देण्यात येते. परंतु योग्य वेळेला बियाण्याची लागवड झाली तर उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्‍ध होऊन उत्‍पन्नात वाढ होते. स्‍थानिक शेतकरी भाजीपाला पिकवत असतानाही सध्या पुणे, नगर, वाई, सातारा, सांगली या ठिकाणांहून कोकणपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होते. त्‍यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीकडे योग्‍य लक्ष दिल्‍यास उत्‍पन्न वाढीबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. परिणाम नोकरी-व्यवसायानिमित्त होणारे स्‍थलांतर रोखता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT