Labor House Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Employment : शेतीची कामे संपल्याने स्थलांतराला सुरुवात

Tribal Migration : ग्रामीण भागातील शेतीची कामे पूर्ण झाल्याने आदिवासी बांधवांनी घराला टाळे ठोकले आहे. रोजगाराच्या शोधात कुटुंबासह आवश्‍यक साहित्य घेत शहराचा रस्ता धरत आहेत.

Team Agrowon

Mumbai News : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिक्षण, रोजगाराची चांगलीच वानवा आहे. या भागात उपलब्ध असणारी मजुरीची कामेदेखील हंगामी असल्याने नाईलाजाने येथील आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही. आता तालुक्यातील आदिवासी बांधवांनी घराला टाळे ठोकत उपजीविकेसाठी शहराची वाट धरली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जव्हार तालुक्यातील अनेक नागरिक हे अल्पभूधारक व भूमिहीन आहेत. खरीप हंगाम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगाराची निकड जाणवते. कुटुंबाचे पालनपोषण करण्याकरिता हे नागरिक रोजगारासाठी मुंबई, वसई, विरार, ठाणे, भिवंडी आणि नाशिक या शहर ठिकाणी, तर अगदी लगत असलेल्या गुजरात राज्यात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे गाव-पाडे ओस पडत आहेत.

पीक कापणी पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी अन्य कामे नसल्याने आदिवासी बांधव आपली घरे सोडून बाहेर शहराकडे स्थलांतर करण्याचे सत्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. रोजगारासाठी स्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर मोठा परिणाम होतो. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा, याकरिता प्रयत्नांना फारसा भाव मिळत नसल्याने भटकंती सुरू आहे.

आमची शेतीची कामे आटोपली की, आम्ही कुटुंबासह शहर ठिकाणी धाव घेतो. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात काम करत असल्याने मजुरीदेखील चांगली मिळते.
मैनी लोखंडे, महिला शेतमजूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cyclosinone Herbicide : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो आणि जिओमार्टला नोटीस; अप्रमाणित तणनाशक विक्रीचं प्रकरण

Kharif Crop Prices: खरीप पिकांच्या भावात तेजी राहणार का?

Vidhan Parishad Election 2026: राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुरळा, विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर

Solar Energy Project: अकोला परिमंडळातील ३३ हजार ३८० वीज ग्राहक बनले वीज निर्माते

School Education System: लाखो मुलांना शाळेबाहेर ढकलणारी व्यवस्था

SCROLL FOR NEXT