Tribal Youth
Tribal Youth Agrowon

Tourism Business : आदिवासी तरुणांना पर्यटनात मोठ्या प्रमाणात संधी

Tribal Youth : आदिवासी तरुणांना कृषी, निसर्ग व साहस पर्यटनात मोठ्या प्रमाणात संधी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी गाव पातळीवर समिती तयार करून पुढाकार घ्यावा, पर्यटन विभागामार्फत त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
Published on

Pune News : आदिवासी तरुणांना कृषी, निसर्ग व साहस पर्यटनात मोठ्या प्रमाणात संधी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी गाव पातळीवर समिती तयार करून पुढाकार घ्यावा, पर्यटन विभागामार्फत त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

तसेच आदिवासी योजनांतर्गत तरुणांना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून पर्यटन व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान उपलब्ध आहे. याचा लाभ घ्यावा, असे ‍आवाहन पर्यटन विभागाच्या उपसंचालक श्‍यमा पवार यांनी भोरगिरी ( ता. खेड ) येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात केले.

भीमाशंकर अभयारण्य परिसरातील आदिवासी तरुणांना पर्यटन क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी भोरगिरी येथे कल्पवृक्ष, शिवनेरी ट्रेकर्स, भोरगिरी परिस्थितिकी विकास समितीमार्फत १० ऑक्टेबर ते १२ ऑक्टेबर या कालावधीत पर्यटन व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे (घोडेगाव) सहायक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, महालेखापाल राजेंद्र येळीकर, कल्पवृक्षचे खजिनदार प्रदीप चव्हाण व समन्वयक सुभाष डोळस व शिवनेरी ट्रेकर्सचे सचिव संतोष डुकरे यांसह अनेकांनी मार्गदर्शन केले.

Tribal Youth
Tribal Education : आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

यावेळी पवार म्हणाल्या, ‘‘भीमाशंकर परिसरात आदिवासी तरुणांना कृषी व साहस पर्यटनात सर्वाधिक संधी आहेत. शासनामार्फत यासाठी विशेष धोरण व योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा.’’

पर्यटन विभागाचे श्री कुलकर्णी यांनी पर्यटन संधी ‌व शासकीय योजनांचे सादरीकरण केले. आदिवासी विकास व वन विभागामार्फत आदिवासी तरुणाईसाठी उपलब्ध असलेल्या पर्यटन व्यवसाय संलग्न योजनांची माहिती आली.

Tribal Youth
Tribal Credit Society : आदिवासी सोसायट्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील

भीमाशंकर लगतच्या आहुपे व म्हातारबाची वाडी येथे महिला बचत गटांनी सुरू केलेल्या इको टुरिझम प्रकल्पांच्या यशोगाथांचे सादरीकरण तुषार पवार यांनी केले. जुन्नर येथील समीर शिंदे यांनी त्यांच्या माळशेज लेक कॅम्पिंग या कॅम्पसाइट पर्यटन व्यवसायाची माहिती व अनुभवकथन केले.

भीमाशंकर परिसरातील कातकरी व महादेव कोळी समाजाच्या तरुणांना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून पर्यटन व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान उपलब्ध आहे, तरुणांनी समुहाने केलेल्या पर्यटन व्यवसायालाही हे अनुदान देण्यात येते, इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे (घोडेगाव) सहायक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com