Shepherd Migration Agrowon
ॲग्रो विशेष

Migration of Shepherds : दुष्काळाच्या चटक्यांकुळे मेंढपाळांचे स्थलांतर

Drought Condition : प्यायलाच पाणी नसल्याने चारा व पाण्याच्या शोधात सध्या खामखेडा, पिळकोस परिसरात कुटुंब आणि काफिल्यासह दाखल होऊ लागले आहेत.

Team Agrowon

Nashik News : माळमाथा भागासह बागलाण तालुक्यातील अनेक गावातील मेंढपाळांची कुटुंबे बैलगाडीसह स्थलांतर करीत आहे. प्यायलाच पाणी नसल्याने चारा व पाण्याच्या शोधात सध्या खामखेडा, पिळकोस परिसरात कुटुंब आणि काफिल्यासह दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी दुष्काळाची भयावह परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

मुक्‍या जनावरांनाही पुढील तीन महिने पाणी व चारा मिळावा. याकरिता माळमाथ्यावरील गावांतील मेंढपाळांच्या मेंढ्यांची चारा-पाण्यासाठी होत असलेली तडफड स्थलांतरापर्यंत येऊन पोहचल्याचे विदारक चित्र देवळा व कळवण तालुक्यात आलेल्या मेंढपाळांच्या जथ्याकडे पाहिल्यावर दिसत आहे.

कळवण हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जात असल्याने या भागात जनावरांना चारा तर जाऊ द्या पण पाणी तर मिळेल.या आशेवर सध्या कळवण तालुक्यातील गिरणा नदीकाठावरील व पुनंद नदीकाठावरील गावांमध्ये मालेगाव व बागलाण भागातील शेकडो मेंढपाळ आपल्या कुटुंबकबिल्यासह दाखल होऊ लागले आहेत.

या परिसरात मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ बांधव आहेत. यावरच मोठ्या प्रमाणावर चरितार्थ चालत असल्याने चारा-पाण्याअभावी तडफड होत असल्याने तालुक्‍यात गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांच्या पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. मात्र, सध्या वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेने पाण्याचे सर्व जलस्रोत कोरडेठाक पडल्याने रानावनात शेळ्या-मेंढ्यांना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे.

चार-चार, पाच-पाच किलोमीटरची पायपीट करून मेंढपाळ मुक्‍या जिवांची तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या भागातील अनेक मेंढपाळ गेल्या आठवडाभरापासून कळवण तालुक्यात मजल दरमजल करत डेरेदाखल होत आहेत.

मेंढपाळांनी वळविला गिरणा नदीकाठावरील गावांकडे मोर्चा

खामखेडा, विसापूर, भादवन, चाचेर, लोहणेर, विठेवाडी, भेंडी, कळवण रस्त्यावर व परिसरातील जवळजवळ सर्वच रस्त्यांवर मेंढपाळांचे जत्थे नजरेस पडत आहेत. आतापर्यंत कशीबशी मेंढ्यांच्या पाण्याची सोय त्यांनी केली. पण, आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने मेंढ्यांची तहान भागविण्याचेच मोठे दिव्य असल्याने मालेगाव व बागलाण भागातील मेंढपाळांनी गिरणा नदीकाठावरील गावांकडे मोर्चा वळवला आहे. सध्या पिळकोस, बगडू, भादवन, विसापूर, बिजोरे आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ डेरेदाखल होऊ लागली आहेत.

चाऱ्या-पाण्याविना प्रचंड हाल होत असून,संपूर्ण कुटुंबासह पाण्यासाठी आम्ही शंभर ते सव्वाशे किलोमीटर स्थलांतर केले आहे. यावर्षी प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे.जनावरे जगविणे, हेच आमच्यापुढे दिव्य आहे.
नथु खिल्लारी, मेंढपाळ, अमरावती पाडे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT