Shephard : खानदेशात मेंढपाळ यंदा लवकर दाखल

Shephard in Khandesh : खानदेशात विविध भागांत यंदा मेंढपाळ सुमारे ३० ते ३५ दिवस लवकर दाखल झाले आहेत.
Shephard
ShephardAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात विविध भागांत यंदा मेंढपाळ सुमारे ३० ते ३५ दिवस लवकर दाखल झाले आहेत. दुष्काळी स्थितीचा सामना या मंडळींना करावा लागत असून, आपापल्या भागातून लवकर स्थलांतर करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

खानदेशातील मेंढपाळ नाशिक जिल्ह्याच्या सीमेलगत वास्तव्यास आहेत. धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारलगत मेंढपाळ बांधवांचे वास्तव्य आहे. ही मंडळी चार ते सहा महिने आपल्या भागात पीकपाणी व अन्य बाबींसाठी वास्तव्यास असते. आपल्याकडे दुष्काळी स्थिती तयार होताच किंवा जलसाठे, शिवारात कोरडेपणा आल्यानंतर ते स्थलांतर करतात.

Shephard
Natural Disaster : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्यांना मिळणार नुकसान भरपाई; सरकारने दिली १०६ कोटी निधी वितरणास मान्यता

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, अमळनेर, पारोळा, भडगाव, पाचोरा, जामनेर, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात आपापले मेंढ्यांचे कळप घेऊन मेंढपाळ बांधव पाच ते सहा महिने थांबतात. या भागात पऱ्हाटीची उलंगवाडी मार्चमध्ये सुरू होते. तसेच रब्बी पिकांतील काढणीही याच काळात पूर्ण होते. दरवर्षी मार्चअखेरीस ही मंडळी आपल्या मूळ भागातून स्थलांतर करायची.

परंतु यंदा याच महिन्यात ही मंडळी स्थलांतरित झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, रावेर, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर आदी भागांत ही मंडळी दाखल झाली आहे. आपले बिऱ्हाड, कुटुंब व मेंढ्यांसोबत ही मंडळी मोकळे शिवार किंवा नदी, खोऱ्यांत आहे. जेथे पशुधनाला चारा व पाणी उपलब्ध आहे, तेथे ही मंडळी दिसू लागली आहे.

Shephard
Chandoli Project : चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला यश, ३ महिन्यात जमिनी मिळणार

एका कळपात एक ते दीड हजारांवर मेंढ्या असतात. सध्या मळणी, कापणीचा हंगाम खानदेशात सुरू आहे. शिवारात थेट मेंढ्यांना चरण्याची परवानगी शेतकरी देत नसल्याची स्थिती आहे. कारण अद्याप कापणी, मळणी सुरू आहे. यामुळे नदी, खोऱ्यांत त्यांना थांबावे लागत आहे.

दरवर्षी मेंढपाळ बांधव खानदेशातील विविध शिवारांत एप्रिल महिन्यात दिसायचे. यंदा मात्र याच महिन्यात दिसू लागले आहेत. आपल्या घरी किंवा गावाकडे कुटुंबातील एक सदस्य वास्तव्यास असतो. तो घरी शेती व अन्य जबाबदाऱ्या पार पाडतो. तर अन्य बांधव मेंढ्या - बिऱ्हाडासोबत स्थलांतर करतात.

चराईसाठी क्षेत्र रिकामे करून द्यावे लागतेय

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, पारोळा, मुक्ताईनगर भागात काही शेतकऱ्यांनी आपली पऱ्हाटी मेंढपाळांकडून चराईच्या बदल्यात उपटून शेत रिकामे करून घेतले आहे. उलंगवाडी झालेल्या कापूस किंवा पऱ्हाटीच्या क्षेत्रात मेंढ्या चारून घ्या व नंतर पऱ्हाटी उपटून घ्या, असा तोंडी करारनामा शेतकरी मेंढपाळांसोबत करून घेतात. तसेच काही शेतकरी ७०० ते एक हजार रुपये प्रतिदिवस किंवा २४ तास असा मोबदला मेंढ्या शेतात बसविण्यासाठी काही भागात देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com