MiDigitek Agriculture Solutions Pvt Ltd Agrowon
ॲग्रो विशेष

MiDigitek: मिडिजिटेकची अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रे

Farm Equipment Company : पुणे स्थित शरद पाटील यांच्या मिडिजिटेक ॲग्रिकल्चर सोल्यूशन्स कंपनीने शेतकऱ्यांसाठी वापरण्यास सुलभ, माफक दरातील आणि संपूर्ण भारतीय बनावटीची स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रे सादर केली असून, आता ही यंत्रे परदेशांतही निर्यात होत आहेत.

Team Agrowon

Indian Agri Startup: पुणे स्थित शरद पाटील यांच्या मिडिजिटेक ॲग्रिकल्चर सोल्यूशन्स या कंपनीने स्वयंचलित ठिबक सिंचन- फर्टिगेशन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रांची मालिका शेतकऱ्यांसाठी सादर केली. उच्च आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम गुणवत्ता, खात्रीशीर सेवा यांच्या जोरावर ही यंत्रे आज शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहेत. सहज वापरण्याजोगी व माफक किमतीलाही परवडतील अशा या यंत्रांनी आता परदेशात निर्यात करण्याचे पुढील पाऊलही टाकले आहे.

हवामानबदल व शेतीतील वाढत्या समस्यांच्या काळात पेरणी ते काढणीपर्यंत यंत्रांचा सहभाग अधिक वाढल्यास शेतकऱ्यांचे कष्ट सुकर होऊ शकतील. पुणे स्थित कृषी उद्योजक शरद पाटील यांनी स्थापन केलेली मिडिजिटेक ॲग्रिकल्चर सोल्यूशन्स कंपनी याच ध्येयाने आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल करते आहे.

सांगली जिल्ह्यातील दूधगाव हे मूळ गाव असलेल्या पाटील यांनी रसायनशास्त्र विषयात बीएस्सी, तर कृषी रसायने आणि कीड व्यवस्थापन (Agro chemical Pest Management) या विषयात पदव्युत्तर पदवी (एमएस्सी) घेतली. त्यानंतर खतनिर्मिती कंपनीच्या हरितगृहात ‘ॲग्रोनॉमिस्ट’ म्हणून ते नोकरीस लागले. तिथं पीक व्यवस्थापन, किडी-रोग, अन्नद्रव्ये, सिंचन आदी विषयातील ज्ञानाचा पाया अधिक मजबूत झाला. तीन वर्षे अनुभव घेतल्यानंतर पाटील यांनी स्वतःची ‘कन्सल्टन्सी’ सुरू करून वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली.

वाढला ज्ञानाचा आवाका

‘कन्सल्टन्सी’च्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांचा दौरा, तेथील पीक पद्धती, हवामान, जमीन यांचा सखोल अभ्यास झाला. या काळात पाटील यांना शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची आणि त्याच्या वापराविषयीही योग्य मार्गदर्शनाची गरज जाणवली. त्या वेळी इस्राईलहून ठिबक सिंचनातील स्वयंचलित यंत्रणा (ड्रीप ऑटोमेशन) यंत्रणा मागवावी लागायची. ती ‘ऑफलाइन’ आणि महागडी होती. पाटील यांना ‘ऑनलाइन ऑटोमेशन’ची संधी दिसली. त्याद्वारे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, मनुष्यबळ यात बचत होऊन पीक उत्पादनातही वाढ होणार होती.

कल्पना आणली प्रत्यक्षात

आपल्या डोक्यातील संकल्पना प्रत्यक्ष साकारण्याच्या दृष्टीने पाटील यांचे प्रयत्न सुरू झाले. सन २०१२ ते २०१४ पर्यंत त्यांनी अविरत कष्ट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतातील खते, सिंचनविषयक व अन्य अडचणी, गरजा समजून घेतल्या. त्यानुसार वापरण्यास सोपे व परवडणायोग्य तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली. संशोधन, यांत्रिक कार्य आणि ‘सॉफ्टवेअर’ या तीनही विषयांत पाटील यांचा हातखंडाच तयार झाला. त्यातूनच सन २०१७-१८ च्या दरम्यान प्रायोगिक मॉडेल तयार झाले. बघता बघता स्वयंचलित ठिबक सिंचन- फर्टिगेशन तंत्रज्ञानावर आधारित १३ यंत्रे तयार झाली आणि विकली देखील गेली. यंत्रनिर्मितीत मेस्ट्रोटेक इनोव्हेशन या कंपनीची साथ होती.

कंपनीचा विस्तार

सन २०२० पासून ‘मेस्ट्रोटेक इनोव्हेशन’ने पाटील यांना नवे ‘हार्डवेअर’ व ‘सॉफ्टवेअर’ तयार करून दिले. त्यानंतर मिडिजिटेक नावाने एकत्र कामास सुरुवात झाली. त्यातून ‘फ्लोडॅक’ हा ब्रँड बाजारात आणण्यात पाटील यांना यश मिळाले. हा संपूर्ण काळ त्यांच्यासाठी संघर्षाचा होता. अनेक चढ-उतार आले. अपयश सोसावे लागले. त्यात भर म्हणून की काय कोरोनाचे संकट उभे ठाकले. परंतु चिकाटी, जिद्द, कष्टांची तयारी, ज्ञान घेण्याची आस यांच्या जोरावर न डगमगता आपला प्रवास सुरू ठेवला. प्राध्यापक असलेल्या वडिलांनीही मुलाला तेवढाच खंबीर पाठिंबा दिला. कंपनीतील सर्व कर्मचारी भक्कमपणे पाठीशी उभे राहिले. त्याचेच फळ म्हणजे आज मिडिजिटेकचे संपूर्ण देशभर ग्राहक तयार झाले आहेत. देशातील ११ कृषी विद्यापीठांसोबत या कंपनीने करार केला आहे. अजून सहा विद्यापीठे लवकरच कंपनीसोबत जोडली जाणार आहेत. पुणे येथील आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनमध्येही मिडिजिटेकने सहभाग नोंदवला.

निर्यातीत पुढचे पाऊल

शेतात खते- पाणी वापर (फर्टिगेशन), ईसी, सामू या बाबींचे नियंत्रण काटेकोर असणे महत्त्वाचे असते. मिडिजिटेकची यंत्रणा शेतात बसविल्यानंतर या बाबींची शेतकऱ्यांना चिंता करण्याची काहीच गरज नसते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची जोड यंत्रांना दिल्याने खते व पाणी हे घटक कोणत्या वेळी, किती प्रमाणात द्यायचे, सामू आणि क्षारता या बाबी किती ठेवायच्या याचे अचूक नियोजन यंत्रांकडून केले जाते. मुख्य म्हणजे मिडिजिटेकने आपली यंत्रे माफक दरात उपलब्ध केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ती लोकप्रिय झाली आहेत. आता कंपनीने निर्यातीचेही पाऊल उचलले आहे.

कॅनडा, अमेरिका, जर्मनी आदी देशांत मिडिजिटेक कंपनीने आपली स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रे निर्यात केली आहेत. अशा स्वरूपाची ही पहिली भारतीय कंपनी असावी. मोठ्या प्रमाणात वितरकांची साखळी निर्माण केली जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची कंपनीची धडपड आहे.शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानासोबत मैत्री केली पाहिजे. उद्योजकांनीही शेतकऱ्यांना सहज वापरता येईल असे तंत्रज्ञान विकसित केले पाहिजेत या मुद्द्याबाबत पाटील आग्रही आहेत. ते म्हणतात, की दोन टक्के शेतकऱ्यांकडेच स्वयंचलित ठिबक तंत्रज्ञान आहे. त्याचे प्रमाण वाढायला हवे. संशोधनाला अधिकाधिक चालना मिळायला हवी.

मिडिजिटेक तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये

  वापरण्यास सहजसोपी, कमी मनुष्यबळाची गरज असलेली यंत्रे. (User-friendly)

  ‘ईसी’, ‘पीएच’ पिकांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा.

  पीकनिहाय फर्टिगेशनची शिफारस.

  पेरणी ते काढणीपर्यंत यंत्रांवर अवलंबित्व शक्य.

  शेतकऱ्यांना परवडेल अशी कमी किंमत.

  अत्यंत कमी देखभालीची गरज. विक्रीपश्‍चातही सर्व मार्गदर्शन, सेवा.

  ‘मेक इन इंडिया’ मिशन अंतर्गत संपूर्णपणे भारतीय बनावटीची यंत्रे.

  फ्लोडॅक गोल्ड सीरिज (FlowDac Gold Series), फ्लोडॅक ॲक्यू पीएच सीरिज (FlowDac Accu-pH Series), फ्लोडॅक फर्टि कंट्रोल सीरिज, कंट्रोलर्स, फ्लोडॅक एअर ही कंपनीने विकसित केलेली महत्त्वाची यंत्रे.

 कंपनीचा ‘बेस्ट ॲग्रिकल्चरल ऑटोमेशन- २०१९’ या पुरस्काराने गौरव.

शरद पाटील (संचालक)   ९२२६५३१०६२

https://midigitek.com

sales@midigitek.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT