Pink Bollworm: गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक तंत्रज्ञान विकसित

Genetically Modified Technology: देशातील कापूस पिकामध्ये सातत्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे उत्पादनात घट आणि लागवड क्षेत्रावर परिणाम झाला आहे.
Pink Bollworm
Pink BollwormAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: देशातील कापूस पिकामध्ये सातत्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे उत्पादनात घट आणि लागवड क्षेत्रावर परिणाम झाला आहे. ही बाब गांभीर्याने घेत लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेने गुलाबी बोंड अळीला प्रतिकार करणारे जनुकीय सुधारित तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा केला आहे.

गुलाबी बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या व्यवस्थापन खर्चात वाढ झाली आहे. यामुळे अन्य पर्यायी पिकांकडे शेतकरी वळत आहेत. देशात कापूस लागवडीखालील सरासरी क्षेत्र १३० लाख हेक्‍टरपर्यंत असते. यंदाच्या हंगामात लागवड क्षेत्र ११३ लाख हेक्‍टरपर्यंत मर्यादित राहील, असा अंदाज आहे. २०२५-२६ या वर्षात हे क्षेत्र सुमारे १०० लाख हेक्‍टरपर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही बाब गांभीर्याने घेत लखनऊ येथील राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी जनुकीय सुधारित तंत्रज्ञान विकसित केले आहे.

Pink Bollworm
Pink Bollworm Management : कपाशीत एकात्मिक व्यवस्थापन तंत्रज्ञान अवलंबावे

या बाबत माहिती देताना संस्थेतील तज्ज्ञ डॉ. पी. के. सिंग म्हणाले, की या तंत्रज्ञानात वापरण्यात आलेले ‘इंजिनिअर्ड बीटी क्राय प्रोटीन’ हे गुलाबी बोंड अळीसाठी प्रतिकारक्षम असल्याचे अभ्यासाअंती समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीजी-२ मध्ये याचा अंतर्भाव करीत चाचणी घेण्यात आली.

याचेही निष्कर्ष सकारात्मक आहेत. सध्या अस्तित्वात असलेले जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा प्रभाव १२० दिवसांपर्यंत राहतो. परंतु भारतीय स्तरावर विकसित गुलाबी बोंड अळी प्रतिकारक जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा प्रभाव कालावधी हा १६० दिवसांपर्यंत आहे. त्यामुळे अधिक कालावधीचे वाण लागवड असलेल्या तेलंगणा राज्यासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर राहील.

Pink Bollworm
Pink Bollworm Infestation : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यात यश
संपूर्ण भारतीय बनावटीचे हे तंत्रज्ञान ‘इंजिनिअर्ड बीटी क्राय प्रोटीन’च्या धर्तीवर काम करणार आहे. पेटंट विषयक प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने सध्या याला तांत्रिक नाव देण्यात आले नाही. पेटंट मिळाल्यानंतर हे तंत्रज्ञान सार्वजनिक केले जाईल. सध्या अंकुर सीड कंपनीसोबत या तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
डॉ. पी. के. सिंग, मुख्य शास्त्रज्ञ, आण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान विभाग, राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था, लखनऊ, उत्तर प्रदेश
राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेने विकसित केलेले गुलाबी बोंड अळी नियंत्रण विषयक तंत्रज्ञान प्रभावी असल्याचे निष्कर्ष आहेत. मात्र जीईएसी सह इतर काही विभागाच्या परवानग्या बाकी असल्याने हे तंत्रज्ञान सध्या प्रसारित नाही.
डॉ. सी. डी. मायी जीएम तंत्रज्ञानाचे अभ्यासक
राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेने गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या चाचण्यांसाठी हरियानासह अन्य एका राज्याने परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात चाचण्या घेण्यासाठी कृषी आयुक्तालय आणि कृषी विद्यापीठ स्तरावर संस्थेने प्रस्ताव दिल्याचे ऐकिवात आहे.
डॉ. संजय काकडे, कापूस तज्ज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com