Micro Finance  Agrowon
ॲग्रो विशेष

Microfinance for Women : महिलांनो, कर्जसापळ्यात अडकू नका...

Financial Planning : नुकताच महिला दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने कर्ज काढणाऱ्या गरीब/ निम्न मध्यमवर्गीय बहिणींशी हितगुज. सूक्ष्म कर्ज (मायक्रो लोन), सोने कर्ज (गोल्ड लोन) घेणाऱ्या कर्जदारांपैकी ९० टक्के महिला आहेत.

संजीव चांदोरकर

Rural Financing : नुकताच महिला दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने कर्ज काढणाऱ्या गरीब/ निम्न मध्यमवर्गीय बहिणींशी हितगुज. सूक्ष्म कर्ज (मायक्रो लोन), सोने कर्ज (गोल्ड लोन) घेणाऱ्या कर्जदारांपैकी ९० टक्के महिला आहेत. ‘कर्ज’ नावाच्या पैसारूपी मायावी प्राण्याचे गुणधर्म समजावून घेऊया.

कर्ज तुमची, तुमच्या कुटुंबाची ताबडतोबीची पैशाची चणचण दूर करते, हे मान्य. पण हा प्राणी अनेक दीर्घकालीन अधिक गंभीर प्रश्‍न बरोबर घेऊन तुमच्या घरात घुसून, ठाण मांडून बसतो. या प्राण्याला हुसकावून लावता येत नाही. तो पूर्ण वसुली केल्याशिवाय घरातून जाता जात नाही.

कर्ज तुमच्या भविष्यातील बचतींवर क्लेम चिकटवते. तुम्ही आता दहा हजार रुपये कर्ज घेतले तर पुढच्या बारा महिन्यांत दर महिन्याला तुम्ही जे काही कमावणार आहात त्यातील बाराशे रुपये ईएमआय म्हणून कर्जाने आधीच क्लेम केलेले असतात. बचती तुमच्या श्रमातून तयार होतात.

म्हणजे कर्ज देणारा तुमच्या श्रमातील वाटा आधीच खिशात घालून बसलेला असतो. वाटा म्हणणे चूक आहे. कारण वाटा मिळकतीप्रमाणे कमी-जास्त व्हावयास हवा; तसे कर्जाच्या हप्त्याबद्दल होत नाही. म्हणजे तुमच्या शेतीमालाला भाव मिळो न मिळो, तुम्हाला आज रोजंदारी मिळो न मिळो, तुमचा आज धंदा होवो न होवो... कर्जापोटी ठरलेली रक्कम द्यायची म्हणजे द्यायची.

कर्ज हा निर्दयी प्राणी फक्त तुमच्या बचतींवरच नाही तर तुमच्या खर्चावर देखील क्लेम लावतो. तुमच्या मिळकतीतील पहिला घास त्या प्राण्याला घालावाच लागतो. मग जे पैसे उरतील त्यात संसाराचा खर्च भागवावा लागतो.

कर्ज काढल्यानंतर आपण फक्त व्याजरूपानेच किंमत मोजत नसतो. इतरही अनेक किमती हा कर्ज नावाचा प्राणी आपल्याकडून वसूल करत असतो. व्याज किती भरले हे किमान रुपयांत मोजता तरी येते; पण कर्ज काढल्यानंतर आपण मोजत असलेल्या इतर अनेक किमती रुपयात सहजपणे मोजता देखील येत नाहीत.

चिंतेचा भुंगा आपले मन सतत पोखरत असणे, झोप न लागणे, तब्येतीवर परिणाम होणे, सकस अन्न, मुलांचे शिक्षण, घरातील आजारपण अशा अत्यावश्यक खर्चात काटछाट करावी लागणे, घरातील ताणतणाव वाढणे, वसुली एजंटांनी सार्वजनिक ठिकाणी मानहानी करणे, दहशत बसवणे, धमक्या देणे या सर्वांची रुपयातील किंमत आपण किती लावणार? याचे उत्तर कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. ती किंमत प्रत्येक कर्जदाराने, म्हणजे तुम्ही प्रत्येकीनी ठरवायची आहे.

कर्ज सहजपणे मिळत आहे म्हणून घेऊ नका. अत्यावश्यक खर्चात कपात न करता आपण किती ईएमआय भरू शकतो याचा हिशेब करा. कुटुंबाशी चर्चा करा आणि मग हवे तेवढेच कर्ज काढा. एक रुपया देखील जास्त नाही.

कर्ज देणारे कुठेही पळून जाणार नाहीत कारण तुम्ही कहीही करून कर्ज घेणे त्यांना हवे आहे. तेच तुमच्या मागे मागे येतील. तुम्हाला पिढ्यानपिढ्या औपचारिक बँकिंग / वित्त क्षेत्राच्या गावकुसाबाहेर ठेवणाऱ्या बँका आणि कंपन्याना गेल्या पाच-दहा वर्षांतच अचानक तुमचा कळवळा कसा आला असेल? यावर विचार करा. चालू लोक आहेत ते. तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती कर्ज देण्यामध्ये त्यांचा स्वतःचा स्वार्थी छुपा अजेंडा आहे. तो ओळखा.

तुटपुंज्या पैशाचे नियोजन करण्यासाठी लागणाऱ्या तुमच्या रक्ताच्याच नातेवाइकांकडून नव्हे तर शेजारच्या, वस्तीतल्या, आज्या, आया, मावश्‍या, काक्यांकडून तुम्हाला मिळालेल्या, तुमच्या डीएनए मध्ये वाहत असणारा परंपरागत शहाणपणाचे शस्त्र गंजत पडले आहे. त्याला धार लावा. आणि वापरण्यास सुरुवात करा. तुम्हाला आयुष्यभर खोलवर कर्जबाजारीपणात बुडवून ठेवण्याच्या वित्त भांडवलाच्या अजेंड्याला छेद देण्याची कुवत तुमच्या या पिढ्यानपिढ्या जोपासलेल्या शहाणपणात नक्कीच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT