Micro Finance : ‘फायनान्स’च्या विळख्यातून गरजू कुटुंबांची सुटका

Rural Livelihood Development Mission : वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणत मायक्रो फायनान्सच्या विळख्यातील गरजू कुटुंबांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने बचत गटातून आधार दिला आहे.
Micro Finance Company
Micro Finance CompanyAgrowon
Published on
Updated on

Satara News : वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणत मायक्रो फायनान्सच्या विळख्यातील गरजू कुटुंबांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने बचत गटातून आधार दिला आहे. गत पाच वर्षांत उमेद परिवारातील दोन लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना ७०८ कोटींचे कर्ज अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून दिले. यंदा ‘उमेद’मार्फत १८३ कोटी बँक कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी १५४ कोटी इतके कर्ज वितरण झाले आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान जिल्ह्यातील बचत गटांना वेगवेगळ्या निधीबरोबरच राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातून अत्यल्प व्याजदराचे अर्थसाहाय्य वितरित केले आहे. जिल्ह्यामध्ये विविध मायक्रो फायनान्स कंपन्या २४ ते ३६ टक्के व्याजाने कर्जवाटप करत आहेत.

Micro Finance Company
Micro Finance Company : कर्जाच्या चक्रव्यूहात अडकल्या बचत गटांच्या महिला

याला पायबंद घालण्यासाठी फायनान्स कंपन्यांच्या विळख्यातील वंचित घटकांना उमेद अभियानाने बचत गटाच्या माध्यमातून संघटित केले आहे. त्यांची सावकारी कर्ज भागवण्याबरोबर खावटी गरज पूर्ण करण्यासाठी सात टक्के इतक्या अल्पदरात राष्ट्रीय बँकेच्या माध्यमातून बचत गटांना प्रतिगट दीड ते तीन लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा केला आहे.

दोन लाख महिलांचे संघटन

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्ह्यात २०१९ पासून अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. आजअखेर अभियानाअंतर्गत जिल्ह्यामध्ये २२ हजार ७७६ स्वयंसाहाय्यता समूहामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक महिलांचे संघटन झाले आहे.

Micro Finance Company
Micro Finance Update : मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कोणाचे आणि किती नियंत्रण असते?

ग्रामस्तरावर एक हजार १६८ ग्रामसंघ व प्रभागस्तरावर ६१ प्रभागसंघ स्थापना केले आहेत. अभियानाअंतर्गत स्थापित स्वयंसाहाय्यता समूहातील विविध सदस्य शेती आधारित उद्योग व्यवसाय व बिगरशेती उद्योग व्यवसाय करून विविध उत्पादने बनवीत आहेत.

उमेद अभियानात समाविष्ट असणाऱ्या गटांना बँकाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर सर्व बँका तत्काळ सवलतीच्या व्याजदरात कर्ज वितरण करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी मायक्रो फायनान्सच्या कर्जाच्या विळख्यात न अडकता उमेदच्या गटामध्ये समाविष्ट होऊन बँक कर्जासाठी पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा.
ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com