Pune News : महसूलमध्ये काम करत असताना काही अधिकारी आपल्या मर्जीतील व्यक्तींच्या शिफारशी घेऊन येतात. यापुढे अशा शिफारशीच्या बदल्या केल्या जाणार नाही. मात्र जो अधिकारी चांगले काम करील, ज्याचे काम उत्कृष्ट आहे आणि सीआर (गोपनीय अहवाल) चांगला असेल अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या या थेट प्राधान्याने मेरिटवर केल्या जातील, अशा स्पष्ट सूचना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे विभागाचा प्रशासकीय कामकाजाचा आढावा शुक्रवारी (ता.१०) राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, खासगी सचिव प्रवीण महाजन, विशेष कार्य अधिकारी अरविंद अंतुलीकर, मुद्रांक विभागाचे उपसचिव सत्यनारायण बजाज, अप्पर आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, संतोष पाटील, डॉ. दया निधी, अमोल येडगे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर आदी उपस्थित
श्री. बावनकुळे म्हणाले, की प्रशासनातील अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी घराजवळचे ठिकाण हवे असते. त्यासाठी जवळच्या व्यक्तीच्या शिफारशी घेऊन येतात, पत्रे पाठवतात किंवा एखाद्या व्यक्तीला घेऊन येतात. यापुढे असे धंदे चालणार नसून संबंधित अधिकाऱ्यांनी तन, मन, धनाने नागरिकांसाठी चांगले काम करावे. जेणेकरून नागरिक चांगले नाव घेतील. परंतु काही जण इतरांच्या कामांमध्ये ढवळाढवळ करतात. त्यामुळे काम करताना अडचणी येतात. तसे अधिकाऱ्यांनी न करता लोकांच्या दृष्टिकोनातून काम करावे. बदल्यांसाठी सीआर चांगला ठेवल्यास अडचण येणार नसून त्या नोंदी तपासूनच बदल्या केल्या जातील.
प्रशासनाने दौरे सक्तीने करावे
स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्या वाढत असून त्या सुटत नसल्याने नागरिकांनी कोणाकडे जावे असा प्रश्न उपस्थित करतात. हे प्रश्न जाग्यावरच सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आठवड्यातून एक दिवस, तर एसडीओ आणि तहसीलदार यांनी दोन दिवस प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन ते सोडविले पाहिजे. त्यासाठी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी मुक्कामी राहावे. इतर ठिकाणी थांबू नये. येत्या काळात प्रशासनाला नवीन उपक्रम देणार असून, त्यातून प्रशासन अधिक गतिमान होण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे.
महसूलमत्र्यांनी प्रशासनाला केलेल्या सूचना
शंभर दिवसांत प्रशासन गतिमान करण्यासाठी तातडीने पावले उचला
कलम १५५ चा गैरवापर प्रशासनाने करू नये.
महसूलमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट सूचना कळवाव्यात.
सरकार अजेंड्यावर काम करत आहे. सर्व प्रकरीचे प्रकरणे निकाली काढा.
शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना चांगल्या सुविधा द्या.
उद्दिष्टापुरते काम करू नये. हेतुपुरस्सर काम करू नये. चुका करू नये.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.