Takkal Virus
Hair Fall Disease Agrowon

Buldana Hail Fall News : शेगाव तालुक्यात केस गळतीची समस्या: नागरिकांमध्ये चिंता वाढली

Hailr Fall Virus News : तालुक्यातील गोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांत मागील काही, दिवसांत डोक्यावरील केस गळतीची साथ पसरली असून काही जणांचे दोन दिवसांत टक्कल पडल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
Published on

Buldana News : तालुक्यातील गोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांत मागील काही, दिवसांत डोक्यावरील केस गळतीची साथ पसरली असून काही जणांचे दोन दिवसांत टक्कल पडल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या अज्ञात साथीने प्रशासनातही खळबळ उडाली असून नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही.

या तीन गावांमध्ये सुमारे ५० पेक्षा अधिक व्यक्तींना अचानक केसगळतीचा त्रास जाणवला. बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांत या अज्ञात आजाराने थैमान घातले. अगोदर डोके खाजवणे सुरू होते.

नंतर डोक्यावरील केस थेट हातात येऊ लागतात. तिसऱ्या दिवशी टक्कल पडत असल्याने रहिवासी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. सर्वेक्षण झाले आहे व पाण्याचे नमुने घेण्यात आले असून साथरोग अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही कळवण्यात आले आहे.

काही जण खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. शिवसेना तालुका प्रमुख रामेश्वर थारकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देत या गावांमध्ये उपचार व मार्गदर्शन शिबिर घेण्याची मागणी केली आहे.

Takkal Virus
Agriculture Warehouse : गोदाम उभारणी करताना घ्यावयाची काळजी

‘या प्रकाराचा आम्ही शोध घेत आहोत’

शेगाव तालुक्यातील गोंडगाव, कालवड व हिंगणा वैजनाथ या गावांमध्ये केस गळतीचे जवळपास ६० रुग्ण निदर्शनास आले आहेत. एकाच कुटुंबातील दोन ते तीन व्यक्तीचे केस गळून पडत असल्याने टक्कल येत आहे.

तालुका आरोग्य प्रशासनाने सर्वेक्षण केले असून पाण्याचे नमुने घेण्यात आले आहे. अचानक उद्भवलेल्या या आजारामुळे आश्चर्यचकित झालेलो आहोत. नेमका प्रकार काय घडतो आहे याचा आम्ही शोध घेत आहोत, असे शेगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली भायेकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com