Memorandum of Understanding Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV, Sanskrit University : ‘वनामकृवि, संस्कृत विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

Memorandum of Understanding : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (वनामकृवि) आणि रामटेक (जि. नागपूर) येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्यात एक ऐतिहासिक सामंजस्य करार झाला आहे.

Team Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (वनामकृवि) आणि रामटेक (जि. नागपूर) येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्यात एक ऐतिहासिक सामंजस्य करार झाला आहे. हा करार संस्कृत आणि कृषी क्षेत्रातील ज्ञान, संशोधनाच्या आदान-प्रदानासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सामंजस्य करारावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी मिश्रा आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी यांनी स्वाक्षरी केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात उत्कृष्टता प्राप्त केली आहे. कृषी तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांत विद्यापीठाने आपली ओळख निर्माण केली आहे.

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे संस्कृत भाषा आणि प्राचीन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अध्ययनावर विशेष भर देणारे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात पारंपरिक संस्कृतचे जतन आणि संरक्षण तर केले जातेच, पण आधुनिक दृष्टिकोनातून संस्कृत भाषेचा अभ्यासदेखील केला जातो. हे विद्यापीठ समाजसेवा, वैयक्तिक समृद्धी, नेतृत्व आणि करिअर प्रगतीसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याच्या शैक्षणिक कार्यक्रमांवरही भर देते.

या सामंजस्य कराराद्वारे दोन्ही विद्यापीठांमध्ये कृषी आणि प्राचीन भारतीय ज्ञान प्रणालीसंबंधित संशोधन माहिती, अध्यापन साहित्य आणि इतर संसाधनांची देवाण-घेवाण, कार्यशाळांच्या माध्यमातून अनुभवाधारित शिक्षण, संबंधित क्षेत्रात संयुक्त सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित करून एकमेकांना निमंत्रण देणे, अध्यापन आणि संशोधनाच्या उन्नतीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि माहिती, संशोधन साहित्य, प्रकाशने यांचे आदान-प्रदान करण्यात येईल.

नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार दोन्ही विद्यापीठांद्वारे शैक्षणिक आणि संशोधनात्मक संयुक्त प्रकल्प राबविण्यात येतील. हा करार आधुनिक शिक्षण आणि प्राचीन ज्ञान यांना जोडणारा ठरेल. दोन्ही विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना नवीन संधींचे दरवाजे खुले होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Census : नाशिकमध्ये मोबाईल अॅपद्वारे पशुधन गणना सुरू

NCP ajit pawar Candidate : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही तिसरी यादी आली समोर! तिसऱ्या यादीत फक्त चौघांचा समावेश

E-Peek Pahanai : अकोला जिल्ह्यात ८२ टक्के शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी

Paddy Market : धानाला किमान चार हजार रुपये क्‍विंटलचा दर द्या

Rabi Season 2024 : मराठवाड्यात रब्बी पेरणीची गती मंद

SCROLL FOR NEXT