C. P. Radhakrishnan
C. P. Radhakrishnan Agrowon

Tribal University : नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार

Governor C. P. Radhakrishnan : राज्यपाल राधाकृष्णन हे नाशिक दौऱ्यावर होते. सोमवारी (ता. ९) शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी राज्यपालांनी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
Published on

Nashik News : आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

राज्यपाल राधाकृष्णन हे नाशिक दौऱ्यावर होते. सोमवारी (ता. ९) शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी राज्यपालांनी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

C. P. Radhakrishnan
Tribal Development Board: आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर धान खराब होण्याच्या स्थितीत

या वेळी पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार मुफ्ती महंमद इस्माईल, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नितीन पवार, राहुल ढिकले, हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.

राधाकृष्णन म्हणाले, की आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. या भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल.

या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

C. P. Radhakrishnan
Tribal Development Department Recruitment : आदिवासी विकास विभागाची पदभरती तूर्त स्थगित

आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, की आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश देण्यात येतील.

विद्यापीठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील, यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे. राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदिवासींचे प्रश्न जाणून ते सोडविण्यासाठी आदिवासी लोकप्रतिनिधींची राजभवन येथे बैठक घेण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com