VNMKV Parbhani Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV Parbhani : ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय आणि ‘वनामकृवि’मध्ये सामंजस्य करार

Agriculture Research : की वन नेशन-वन हेल्थ यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विज्ञान आणि अध्यात्माची जोड देणे आवश्यक आहे. याद्वारे योगिक शेतीवर संशोधन करण्यास चालना मिळेल.

माणिक रासवे

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कृषी व ग्रामीण विकास राजयोग शिक्षण आणि संशोधन विभाग यांच्यामध्ये शास्त्रोक्त संशोधनातून शाश्वत योगिक शेतीसाठी गुरुवारी (ता. १५) सामंजस्य करार करण्यात आला.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी तर प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने राजयोगिनी बिके सरला दीदीजी, राजयोगी श्री. बीके राजूभाईजी यांनी स्वाक्षरी केली.

या वेळी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, डॉ. हरीश आवारी, डॉ. मदन पेंडके, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. पपीता गोरखडे, वॉव गो ग्रीनचे डॉ. शंकर गोयंका प्रजापिता ब्रह्माकुमारीजचे अर्चना दीदीजी, सीमा दीदीजी, बीके तांदळेभाईजी आदी उपस्थित होते.

डॉ. इंद्रमणी म्हणाले, की वन नेशन-वन हेल्थ यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विज्ञान आणि अध्यात्माची जोड देणे आवश्यक आहे. याद्वारे योगिक शेतीवर संशोधन करण्यास चालना मिळेल. रासायनिक घटकांना पर्याय शोधण्याच्या संशोधनाचे कार्य करण्यात येईल. अध्यात्माचे विशेष शिक्षण देण्यासाठीही या संशोधनाचा लाभ घेता येईल.

त्यादृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण आहे. राजयोगिनी बी. के. सरला दीदीजी म्हणाल्या की, विज्ञान आणि अध्यात्माची समन्वयातून संशोधन करून उत्कृष्ट दर्जाचे वाण आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे कार्य करेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT