Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Issue : दूध दरप्रश्नी आज मुंबईत होणार बैठक

Dairy Farmer In Crisis : दुधाच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : दुधाच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. रयत क्रांती संघटनेने दिवाळीत दुग्धविकासमंत्र्यांच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर नगरला बैठक झाली.

त्यावेळी ठरल्याप्रमाणे आज (ता. २१) मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहावर दुग्धविकासमंत्र्यांसह दूध संघचालक व अधिकाऱ्यांबरोबर दूध दर प्रश्नावर बैठक होणार आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे दूध चारा, पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पशुधन जगविण्याची चिंता निर्माण झालेली असताना खासगी व सहकारी दूध संघचालकांनी संगनमत करून दुधाचे दर पाडले आहेत. चार ते पाच महिन्यांत सुमारे १० ते ११ रुपयांनी प्रतिलिटरचे दर खाली आहेत. दुधाचा दर निश्चित करण्यासाठी शासनाने चार महिन्यांपूर्वी समिती नियुक्ती केली.

मात्र, त्या समितीने काहीही केले नाही. दुधाचे दर कमी करणे, रिटर्नचे दर वाढविणे असा मनमानी कारभार खासगी दूध संघांचा आहे. तरीही पशुसंवर्धनमंत्री, पशुसंवर्धन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. दुधाची भेसळ मात्र राजरोस सुरू आहे.

त्याकडेही शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या लोणी (ता. राहाता) येथील घरासमोर खर्डा-भाकर खाऊन आंदोलन करण्याचा रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला होता. त्यानंतर नगरला बैठक घेण्याचे सांगितल्यावर हे आंदोलन रद्द करीत नगरला बैठक झाली.

त्यात रयत क्रांतीचे पदाधिकारी, सर्व खासगी व सहकारी दूध संघांचे संचालक, प्रतिनिधी, पशुखाद्य उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त आणि अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त, दुग्धविकास मंडळाचे अधिकाऱ्यांबरोबर सकाळी अकरा वाजता सह्याद्री अतिथिगृहावर दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित बैठक होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पाऊस उघडीप देण्याची शक्यता; राज्याच्या बहुतांशी भागात पुढील ५ दिवस पाऊस कमी राहणार

Subsidy Fraud: अनुदान अपहारप्रकरणी सात कर्मचारी बडतर्फ 

Jal Jeevan Mission: सरकारकडून निधी न आल्याने ‘जलजीवन’ची बिले थकली

Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी सुरू

Farmer Loan Waiver : 'पंतप्रधानांशिवाय देवा भाऊचं पानही हालत नाही...'; कॉंग्रेस खासदाराने संसदेत केली कर्जमाफीची मागणी

SCROLL FOR NEXT