Milk Rate Issue : दूधदरप्रश्नी हस्तक्षेप न केल्यास तीव्र आंदोलन

Dairy Farmer Protest : दूधदरात सातत्याने घसरण होत आहे. चार महिन्यांत दहा रुपये प्रतिलिटर दराने दुधाचे दर खाली आले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. ही स्थिती अशीच राहिली तर दूध व्यवसाय उध्वस्त होईल.
Milk Rate
Milk Rate Agrowon
Published on
Updated on

Nagar News : दूधदरात सातत्याने घसरण होत आहे. चार महिन्यांत दहा रुपये प्रतिलिटर दराने दुधाचे दर खाली आले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. ही स्थिती अशीच राहिली तर दूध व्यवसाय उध्वस्त होईल. खासगी दूध संघचालकांची मनमानी सुरू आहे. दूधदर प्रश्नावर शासनाने दुग्धविकास विभागाने हस्तक्षेप करावा, अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन करू, असा इशारा किसान सभेने दिला आहे.

किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सतीश देशमुख, जोतीराम जाधव, रामनाथ वदक, महादेव गाढवे, इंद्रजित जाधव, दादा गाढवे, दीपक पानसरे, डॉ. अशोक ढगे आदींनी दिलेल्या निवेदनानुसार, राज्यात दूध संघ व कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने उत्पादक हवालदिल झाले आहेत.

Milk Rate
Milk Rate : दुधदर प्रश्नी शेतकरी अक्रमक रविवारी राज्यात करणार अंदोलन

दरातील चढ-उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने खरेदी दर निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीने दर तीन महिन्यांनी खरेदीदार ठरवावेत. दूध संघ, कंपन्यांनी त्यानुसार दर द्यावेत, असे दुग्धविकासमंत्र्यांनी जाहीर केले होते. यानुसार दुधाला ३४ रुपये दर जाहीर केला. मात्र या दरात रिव्हर्स दरातून दूध कंपन्यांनी दर पाडले.

Milk Rate
Milk Rate : दूधदरासाठी नगरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

आता तर हा आदेशच धाब्यावर बसविण्यात आला आहे. ३४ रुपयांऐवजी दर २७ रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली बनावट दूध निर्मिती हेही दर कोसळण्यामागचे कारण आहे. जोडीला सदोष मिल्कोमीटर व वजनकाट्यांद्वारे शेतकऱ्यांची लूटमार सुरू आहे. त्यामुळे सरकारने हस्तक्षेप करत गायीच्या दुधाला किमान ३५ रुपये दर द्यावा, अशी मागणी किसान सभेने केली आहे.

दूधभेसळ रोखा

भेसळयुक्त दूध नियंत्रणाची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाकडे आहे. वजनकाटे व मिल्कोमीटर तपासण्याची जबाबदारी वजनकाटे वैधतामापन विभागाकडे आहे. दोन्ही विभाग ‘मनुष्यबळाचा अभाव’ हे कारण देत आपली जबाबदारी झटकतात. त्यामुळे दूध भेसळ, वजनकाटे आणि मिल्कोमीटर तपासण्याची जबाबदारी संबंधित विभागांकडून काढून दुग्धविकास विभागाकडे द्यावी. दूध भेसळ रोखावी, अशी मागणी किसान सभेने केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com