Milk Rate : दुधदर प्रश्नी शेतकरी अक्रमक रविवारी राज्यात करणार अंदोलन

Dairy farmer : राज्यात दुधाचे दर खाली आणले जात असल्याने दूध उत्पादक शेतकरी अक्रमक होऊ लागले आहेत.
Milk Rate
Milk Rateagrowon

Ahemdnagar News : राज्यात दुधाचे दर खाली आणले जात असल्याने दूध उत्पादक शेतकरी अक्रमक होऊ लागले आहेत. रविवारी (ता. १९) राज्यातील बहुतांश भागात अंदोलन होणार आहेत. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रास्ता रोको अंदोलन करावे, असे अवाहन करण्यात येत आहे.

Milk Rate
Milk Rate : दूधदरासाठी नगरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे दूध चारा, पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पशुधन जगवण्याची चिंता निर्माण झालेली असताना खासगी व सहकारी दूध संघचालकांनी संगनमत करून दुधाचे दर पाडले आहेत. चार ते पाच महिन्यांत सुमारे १० ते ११ रुपयांनी प्रतिलिटरचे दर खाली आहेत. दुधाचा दर निश्चित करण्यासाठी शासनाने चार महिन्यांपूर्वी समिती नियुक्ती केली. मात्र त्या समितीने काहीही केले नाही. दुधाचे दर कमी करणे, रिटर्नचे दर वाढवणे असा मनमानी कारभार खासगी दूध संघांचा असताना पशुसंवर्धनमंत्री, पशुसंवर्धन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.

Milk Rate
Cow Milk Rate : गायीच्या दुधाला ३५ रूपये दर द्या अन्यथा, किसान सभेचा दुग्ध मंत्र्यांना इशारा

दुधाची भेसळ मात्र राजरोस सुरू असून त्याकडेही शासनाचे दुर्लक्ष आहे. अशा गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादक अक्रमक होत असून रविवारी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूधदरात वाढ करण्यासाठी रास्ता रोको अंदोलन करावे, असे अवाहन करत असल्याचे नगर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी रामनाथ वडक यांनी केले. याबाबत त्यांनी शासनाला निवेदन दिले आहे. दुधाला ४० रुपये प्रतिलिटरचा हमीभाव द्यावा, पशुखाद्याच्या किमती पन्नास टक्के कमी कराव्यात, पशुऔषधावरील जीएसटी कमी करावा, दूध भेसळ थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासह विविध मागण्या आहेत, असे रामनाथ वडक यांनी सांगितले.

जाधवांच्या उपोषणाकडेही दुर्लक्ष

राज्यात दुधाला दर मिळावा यासाठी बारामती तालुक्यातील तरडोली येथील उपसरपंच सागर जाधव गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाकडेही शासन, पशुसंवर्धन विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात असून उपोषणाची तातडीने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा अंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com