Vijay Vaddetivar  Agrowon
ॲग्रो विशेष

Reservation : सगेसोयरे अधिसूचनेविरोधात २० रोजी ओबीसींची सभा

Vijay Vaddetivar : अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ओबीसी समाजाच्या विराट सभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Team Agrowon

Mumbai News : ‘‘मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढताना मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ओबीसी समाजाच्या विराट सभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

श्री. वडेट्टीवार यांच्या सरकारी निवासस्थानी मंगळवारी (ता. ३०) झालेल्या बैठकीला ओबीसी समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘‘आरक्षण देण्यावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. या लढाईमुळे ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्याचे पाप सरकारकडून केले जात आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, भाजप आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री राणे म्हणतात स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. गृहमंत्री म्हणतात सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत.

यावरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमधील विसंवाद दिसून येतो.संभाजीनगर येथील सभेपूर्वी ५ तारखेपासून शक्तीस्थळाना भेट देवून आम्ही स्फूर्ती घेणार आहोत. याची सुरवात चैत्यभूमीपासून होईल,’’ असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

‘सरकारची भूमिका ओबीसींना खड्ड्यात घालणारी’

‘‘सगेसोयरे शब्दामुळे ओबीसी आरक्षणात कोणाचाही शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. सध्याच्या अधिसूचनेत अटी शिथिल केल्यामुळे प्रमाणपत्र कोणालाही मिळू शकते हे चुकीचे आहे. सरकार एकाच समाजाचे हित पाहत आहे. सरकारची ही अडेलतट्टूपणाची भूमिका ओबीसी समाजाला खड्ड्यात घालणारी आहे,’’ असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील

Crop Loan : बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे

Onion Cultivation : कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक

SCROLL FOR NEXT