Drought Condition : दुष्काळग्रस्तांकडून करवसुलीवर वडेट्टीवार यांचे टीकास्त्र

Vijay Vadettivar on Tax in Drought Victim : शेतकरी अडचणीत असल्याने सुरू असलेली वसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Vijay Vadettivar
Vijay VadettivarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत आहे, तरीही राज्य सरकार दावोस दौऱ्यावर ३४ कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहे. दुसरीकडे दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी सरकार वसुली करत आहे. शेतकरी अडचणीत असल्याने सुरू असलेली वसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्यात काही तालुके आणि मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करूनही शेतकऱ्यांकडून वसुली केली जात असल्याचा प्रकार ‘ॲग्रोवन’मधून वृत्ताद्वारे समोर आणला होता. त्यानंतर वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकार एकीकडे दावोस दौऱ्यावर ३४ कोटींची उधळण करत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून वसुली सुरू आहे. यामुळे हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत.

Vijay Vadettivar
Drought Update : दुष्काळग्रस्त गावांत ‘महसूल’ची करवसुली !

वडेट्टीवार म्हणाले, ‘‘राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये महसूल विभागाकडून करवसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. लेखी आदेश वेगळे आणि तोंडी आदेश वेगळे असा खेळ या सरकारने मांडला आहे.

Vijay Vadettivar
Agriculture Tax : शेतसारा ऑनलाइन भरता येणार

सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. दुष्काळग्रस्त भागात सरकारी वसुली, वीजबिल वसुली, कर्जवसुलीला बंदी आहे. तरीही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत तुटपुंज्या सवलती आहेत. तरीही महसूल वसुली, कर्जवसुलीचा तगादा लावला जात आहे. अशा संवेदना गमावलेल्या सरकारला शेतकऱ्यांनी जागा दाखवावी.’’

‘शेतकऱ्यांचा विचार करावा’

नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गाव पातळीवर तलाठ्याकडून करांची वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय अन्य दुष्काळी उपाययोजनांकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

महसूलमंत्र्याच्या जिल्ह्यात महसूल कराची वसुली होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. सरकारने शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये. शेतकऱ्यांकडून वसुली करू नये. दावोसवर उधळपट्टी करताना शेतकऱ्यांचा विचार करावा, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com