Kharif Crop Loan agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Loan : खरीपासाठी पीककर्जाची जुलैअखेर उद्दिष्टपूर्ती करा, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

Kharif Season : खरीप हंगामासाठी पीक कर्जाची जुलैअखेर शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती करा, दुग्ध व्यवसाय अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याला प्राधान्य द्या.

sandeep Shirguppe

Kolhapur Collector Office : कोल्हापूर जिल्ह्याला २६ हजार ७०० कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल (ता.२८) येथे दिली. खरीप हंगामासाठी पीक कर्जाची जुलैअखेर शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती करा, दुग्ध व्यवसाय अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याला प्राधान्य द्या, बँकांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना नियमित आणि चांगल्या पद्धतीने सेवा द्या, तसेच शासकीय योजनांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावा, असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांच्या हस्ते अग्रणी बँकेच्या वार्षिक पतपुरवठा आराखडा पुस्तिका २०२४-२५ चे व ‘आरसेटी’च्या वार्षिक कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बनावट नोटा ओळखणे व नाण्यांच्या वापरा संबंधी जिल्ह्यात जनजागृती मिळावे आयोजित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिले.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ साठी वार्षिक पतपुरवठ्याचे २१ हजार ६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, यातील १५६ टक्के उद्दिष्टपूर्ती मार्चअखेर झाल्याबद्दल सर्व बँकांच्या कामाचे जिल्हाधिकारी येडगे यांनी कौतुक केले.

कृषी क्षेत्रासाठी सहा हजार ४०० कोटी रुपयांचे तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगासाठी नऊ हजार कोटी रुपये तर पीक कर्जासाठी तीन हजार ६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, भारतीय रिझर्व बँकच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभागाचे व्यवस्थापक विशाल गोंदके, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंह, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील.

कृषी विभागातील आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, कौशल्य विकास व स्वयंरोजगार विभागाचे सहायक आयुक्त संजय माळी, माविमचे जिल्हा व्यवस्थापक सचिन कांबळे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम. शिंदे, ‘आरसेटी’चे संचालक उपाध्ये आदी उपस्थित होते. त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन

Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

Animal Feed : चारा-पाण्याचा प्रश्न खानदेशात सुटण्याचे संकेत

Cotton Crop Disease: लाखेगाव, अलीपुरातील कपाशी पिकावर ‘मर’ रोगाचा फटका

SCROLL FOR NEXT