Cotton Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Variety : मेडिकेटेड कापूस वाण विकसित

Medicated Cotton Variety : मेडिकेटेड (वैद्यकीय क्षेत्रासाठी) कॉटन वाणाचा पर्याय केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने उपलब्ध करुन दिला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : मेडिकेटेड (वैद्यकीय क्षेत्रासाठी) कॉटन वाणाचा पर्याय केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने उपलब्ध करुन दिला आहे. व्यावसायिक स्तरावर उपयोगासाठी देखील वाण उपलब्ध असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी दिली. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याची पाणीशोषण क्षमता अधिक आहे.

डॉ. प्रसाद यांच्या माहितीनुसार, मेडिकेटेड कॉटन याला चांगला दर मिळतो. वेचणीअंती त्यावर प्रक्रिया केल्या जातात. त्यानंतर तो बाजारात उपलब्ध होतो. या कापसाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे मायक्रोनीअर ५.५ ते ६ पेक्षा अधिक आहे.

कापड तयार करण्याकामी उपयोगी पडणाऱ्या कापूस वाणात मायक्रोनीअर ३.५ ते ४.५ इतके राहते. या वाणाचा कलर ग्रेड (आरडी) ७४-७५ आहे. म्हणजे हा वाण अधिक पांढरा दिसतो. याची स्टेपल लेंथ २३ असून हे आखूड धागा कापूस वाण असून याची पाणी शोषण क्षमता इतर वाणाच्या तुलनेत २५ टक्‍के अधिक आहे.

मेडिकेटेड कापूस वाणात हे वैशिष्ट्य प्रकर्षाने असावे लागते, त्यामुळे या वाणाच्या संशोधनात यावर विशेष लक्ष्य देण्यात आले आहे. शेतकरी किंवा कंपन्यांची मागणी असल्यास त्याला या वाणाचे बियाणे काही प्रमाणात उपलब्ध करुन देणे शक्‍य होणार आहे.

महाराष्ट्रात सुमारे ३५ टक्‍के क्षेत्र कोरडवाहू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोरडवाहू तसेच हलक्‍या जमिनीसाठी हे वाण उपयुक्‍त आहे. अतिसघन पद्धतीने लागवड केल्यास यापासून हेक्‍टरी वीस क्‍विंटल पर्यंत उत्पादकता मिळू शकते. पहिला आणि दुसरा वेचा घेता येतो. त्यानुसार १२० ते १४० दिवस कालावधीचे हे पीक आहे.
- डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Paddy Procurement: चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित

Pomegranate Orchard Damage: वादळी वाऱ्यासह गारपीट; डाळिंब बागांचे नुकसान

Declining Water Storage: लघु प्रकल्पात १८ टक्के, तर मध्यम प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा

Tractor Cultivation Charges Hike: शेती मशागतीचे दर २०० रुपयांनी वाढले

Drip Irrigation Project: ढिवरवाडी सिट्रस इस्टेटमध्ये अखेर लागणार ड्रीप

SCROLL FOR NEXT