Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : मे महिन्यातील पीक नुकसानीची भरपाई मिळेना

May Rain Crop Damage : अनेकांच्या तक्रारी कमी नुकसानीची किंवा ३० ते ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याची सबब देवून बेदखल करण्यात आल्या. यात काही प्रस्ताव भरपाईसाठी पाठविण्यात आले.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मे महिन्यात पावसाने धुमाकूळ केला. यात केली, पपई, कांदा, भाजीपाला, मका, बाजरी आदी पिकांची हानी झाली. पंचनामे झाले, पण भरपाई अजूनही मिळालेली नाही. अनेकांच्या तक्रारी कमी नुकसानीची किंवा ३० ते ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याची सबब देवून बेदखल करण्यात आल्या.

यात काही प्रस्ताव भरपाईसाठी पाठविण्यात आले. पंचनामे गतीने झाले. पण भरपाई मिळालेली नाही. ६ मे ते २१ मे या कालावधीत खानदेशात विविध भागांत वादळी पाऊस, गारपीट अशी संकटे आली. खानदेशात सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रास या कालावधीत वादळी पाऊस, गारपिटीचा फटका बसला.

एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे ४१०० हेक्टरवरील केळीला मोठा फटका बसला. तसेच कांदा, बाजरी, भाजीपाला पिके, पपई, चाऱ्याचीदेखील नासाडी झाली. बाजरी, मका मळणी लांबली. कांदा काढणी थांबली. यातही मोठी हानी झाली.

विविध टप्प्यांत, कालावधीत वादळी पाऊस, गारपीट झाल्याने पंचनामेही विविध कालावधीत झाले. काही भागात पुन्हा पुन्हा वादळ झाल्याने नुकसानीची टक्केवारी वाढली. जळगाव जिल्ह्यात जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, यावल आदी भागांत वादळी पावसाने अधिकचे नुकसान झाले.

नंदुरबारात ४ ते १२ मे या कालावधीत गारपीट, वादळी पावसाने पपई, केळीची हानी अधिक झाली. कांदा, मका, पपई, केळी, कलिंगड आदी पिकांना फटका अधिकचा बसला. धुळ्यातही शिरपूर, धुळे, साक्री भागात वादळी पावसाचे धुडगूस झाला. काहींचे शडनेट, शेतातील सोलर पॅनल, घरगोठ्यांचेही नुकसान झाले.

काही शेतकऱ्यांनी मका पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते. परंतु यातून परतावे मिळालेले नाहीत. तसेच प्रशासनाने नुकसानीसंबंधी अहवाल पाठविला. पण यातूनही किती व कोणत्या भागातील शेतकऱ्यांना किती मदतनिधी मिळेल, याबाबतही माहिती समोर आलेली नाही.

जिल्हा प्रशासनाने अहवाल नाशिक विभागीय आयुक्तालयात पाठविला आहे. तेथून पुढे वरिष्ठ स्तरावर याबाबत कार्यवाही होईल, असे सांगितले जाते. तलाठी, कृषी सहायक याबाबत कुठलीही स्पष्ट माहिती देत नाहीत, असाही मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT