Crop Damage Compensation : पीक कापणी प्रात्यक्षिक प्रयोगावरच ठरणार नुकसान भरपाई

Crop Insurance Scheme : राज्य सरकारने पंतप्रधान कृषी विमा योजनेत मोठे बदल केले असून नुकसान भरपाईसाठी पूर्वीचे निकष रद्द केले आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Solapur News : राज्य सरकारने पंतप्रधान कृषी विमा योजनेत मोठे बदल केले असून नुकसान भरपाईसाठी पूर्वीचे निकष रद्द केले आहेत. चालू वर्षासाठी पीक कापणी प्रात्यक्षिक प्रयोगावर आधारितच नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाणार आहे.

एक रुपयात पीकविमा योजना ही सरकारने बंद केली असून शेतकऱ्यांना दोन टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. मात्र, सरकारच्या या नव्या योजनेत शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या कृषी मंत्रालयाने पंतप्रधान पीकविमा योजनेत मोठे बदल केले आहेत. या संदर्भातील अध्यादेश काढण्यात आला आहे. या आदेशात नमूद केलेल्या बाबीनुसार पीकविम्याच्या नुकसान भरपाईबाबत यापूर्वीचे सर्व निकष रद्द केले असून पूर्वीप्रमाणेच पीक कापणी प्रात्यक्षिक प्रयोगावरच पीकविमा नुकसान भरपाई ठरवली जाणार आहे. मात्र या नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, असा दावा या क्षेत्रातील जाणकार यांनी व्यक्त केला आहे.

Crop Damage
Crop Insurance Scheme: खरीप २०२५ साठी सुधारित पिक विमा योजना

सोलापूर जिल्ह्यात होणार हे बदल

सोयाबीनचा पीक विमा भरताना शेतकऱ्यांना भरावे लागणार प्रतिहेक्टरी एक हजार रुपये तर कांद्यासाठी भरावे लागणार ६८० रुपये, तूर ७४४, मूग ७०, उडीद ५००, मका ५४०, भुईमूग ९५, ज्वारी ७०, बाजरी ७६ रुपये शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी भरावे लागणार आहे.

Crop Damage
Mosambi Crop Insurance: मोसंबी फळपिकासाठी विमा योजना

असे आहेत नव्या योजनेतील बदल

संपूर्ण राज्यासाठी दोनच विमा कंपन्यांची नेमणूक

एकूण संरक्षित रकमेपैकी खरीप पिकासाठी दोन टक्के तर रब्बी हंगामासाठी दीड टक्के रक्कम शेतकरी हिस्सा. नगदी पिकासाठी ५ टक्के शेतकरी हिस्सा

विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य

खरीप हंगामामध्ये तृणधान्यात भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर व मका तर नगदी पिकामध्ये कापूस व कांद्याचा समावेश. गळीत धान्यामध्ये भुईमूग, तीळ, कारळे व सोयाबीनचा समावेश

रब्बी हंगामासाठी गहू, ज्वारी, हरभरा व उन्हाळी गणित धान्य भुईमूग तर नगदी पिकात रब्बी कांद्याचा समावेश

२०२५-२६ या एकच वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना

नैसर्गिक आपत्ती, रोग व कीड प्रादुर्भावामुळे प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान विमा संरक्षणात

प्रथमदर्शनी नव्या पीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांना फायद्याऐवजी तोटा होणार आहे. मंडलनिहाय पीक काढणी प्रात्यक्षिक अहवालामुळे मोठा फटका बसणार आहे. सध्या पावसात असमतोल असून मंडलातच गावनिहाय पावसात मोठी तफावत आहे. यामुळे पीक कापणी प्रात्यक्षिक अहवाल आधारित विमा योजनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे, असे सद्यःस्थितीला तरी दिसत आहे.
- शाहरुख पटेल, माजी सदस्य, पीकविमा योजना समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com