Hot Weather Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Weather : खानदेशात कमाल तापमान वाढले

Weather Update : कमाल तापमान खानदेशात सातत्याने वाढत असून, उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Jalgaon News : कमाल तापमान खानदेशात सातत्याने वाढत असून, उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांपार असल्याने उन्हाचा चटका अधिक तापदायक होत असून, केळी, फळबागांचे सिंचन व उष्ण वाऱ्यांपासून पीक बचावासंबंधीची कार्यवाही शेतकरी काटेकोरपणे करून घेत आहेत.

लहान पपई, केळी, कलिंगड पिकास उष्णतेचा फटका बसत आहे. कलिंगडाची फळे केळीची कोरडी पाने व अन्य सामग्रीने झाकून ठेवावी लागत आहेत. तसेच केळी व अन्य फळ बागांभोवती शेतकरी हिरवी नेट लावून उष्ण वाऱ्यांपासून पिकांचा बचाव करीत आहेत.

शनिवारी (ता. १६) पारा ३६ अंशांवर होता. रविवारी (ता. १७) एक अंशाने वाढून ३७.७ पर्यंत गेला. तर सोमवारी (ता. १८) व मंगळवारी (ता. १९) ३७ अंशांवर होता. सकाळी दहापासून चटके बसत होते. बुधवारी कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत होते. दिवसा हवेची कमाल गती तशी ३२ किलोमीटर प्रतितास होती. आकाश सकाळपासूनच निरभ्र होते. शनिवारपर्यंत (ता. २३) कमाल तापमान सरासरी ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. किमान तापमान १९ अंशांपेक्षा जास्त नसेल. आकाश निरभ्र राहील.

शेतीकामे सकाळीच

दुपारी उन्हाचा चटका वाढत असल्याने शेतीकामे सकाळीच उरकून घेतली जात आहेत. पिकांची कापणी, मळणी आदी कामे सकाळी साडेसात किंवा आठ ते दुपारी दोनपर्यंत पूर्ण करून घेतली जात आहेत. तसेच केळी, कलिंगड, पपई काढणीची कामेही लवकर उरकून घेतली जात आहेत. वातावरणातील बदलामुळे आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे.

लहान मुले व वयोवृद्धांना जास्त फटका बसला आहे. आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली. नाकातून रक्त येणे, सर्दी-तापाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेत अधिक पाणी पिणे, उन्हात जाताना डोक्याला रूमाल बांधणे, आरोग्यदायी आहार घेणे असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

किमान तापमान स्थिर

किमान तापमानात मात्र मोठी वाढ झालेली नाही. सायंकाळी सातनंतर गारवा तयार होत आहे. किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. पहाटे चांगला गारठा असतो. यामुळे रात्री उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. परंतु दुपारी १२ ते चार या कालावधीत उष्णता असह्य झाली आहे. सायंकाळी पाच वाजता तापमानात घसरण झाल्यानंतर गार वारे वाहू लागतात. रात्री आठपर्यंत गारवा तयार होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Health: एकात्मिक खत व्यवस्थापनातून राखा जमिनीचे आरोग्य

Small Fish Nutrition: लहान स्थानिक मासे : दुर्लक्षित, पण मौल्यवान अन्न स्रोत

Teachers Award: जालन्याचे दहा शिक्षक ठरले राज्याचे ‘आयडॉल’

Revenue Camp: सुटाबुटातला दरबार थेट जनतेच्या दारात; सरकार आलं दारी

Egg Prices: आखाती देशांत निर्यात थांबल्याने अंड्यांचे दर घसरले, पोल्ट्री उत्पादक अडचणीत

SCROLL FOR NEXT