Marigold Flower Agrowon
ॲग्रो विशेष

Marigold Market : झेंडूचे दर किलोला ५५ रुपये

Team Agrowon

Nagpur News : बंगळूर येथून दहा टन झेंडूची आवक होत असताना स्थानिकस्तरावरील शेतकऱ्यांना देखील झेंडू फुलांपासून चांगला परतावा मिळत असल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतकऱ्यांद्वारे झेंडूची लागवड करण्यात आली आहे. सध्या झेंडूच्या फुलांना ५० ते ५५ रुपये किलोला दर मिळत असल्याचे राहुल नारळे यांनी सांगितले.

सण-उत्सवाच्या काळात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना याच काळात चांगला परतावादेखील मिळतो. यंदा संततधार पावसामुळे झेंडूच्या फुलांना फटका बसल्याने नेताजी फूल बाजारात स्थानिकस्तरावरून झेंडूची आवक कमी असल्याचे सांगितले जाते. सध्या बाजारात बंगळूर भागातील झेंडू फुलांची सर्वाधिक दहा टनाची आवक होत आहे.

नागपूर जिल्ह्यात काही शेतकऱ्यांद्वारे झेंडू लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बोरी (ता. काटोल) येथील राहुल मोहन नारळे यांचाही समावेश आहे. अर्धा एकरावर त्यांची दर वर्षी लागवड राहते.

सध्या अर्धा एकरातून ४० ते ४५ किलो झेंडू निघत असल्याचे त्यांनी सांगितले. काटोल येथील घाऊक व्यापारी फूल विक्रेते यांच्याकडूनच या फुलांना मागणी असल्याने चांगला परतावा मिळत आहे. सध्या झेंडूची विक्री ५० ते ५५ रुपये दराने होत आहे. यापुढील काळात मागणीत वाढ झाल्यास यापेक्षा अधिक दर मिळू शकतील, असा विश्‍वास राहुल नारळे यांनी व्यक्‍त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

Bamboo Farming : पृथ्वी रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त : पाशा पटेल

Agriculture PG Admissions : कृषी ‘पदव्युत्तर’ अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Fish Production : पर्ससीन, एलईडी मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात घट

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

SCROLL FOR NEXT