Marigold Agrowon
ॲग्रो विशेष

Marigold Price : झेंडूला दर न मिळाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत

Farmer Issue : प्रतिकिलो दहा रुपये बाजारभाव मिळत असल्याने साधी मजुरीसुद्धा हातात शिल्लक राहत नसल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

Team Agrowon

Nirgudsar News : सध्या झेंडू फुलांना कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने फूल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. प्रतिकिलो दहा रुपये बाजारभाव मिळत असल्याने साधी मजुरीसुद्धा हातात शिल्लक राहत नसल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांनी फूल लागवडीसाठी मशागत, खते, कीटकनाशके, ठिबक मल्चिंग, रोपे आदीसाठी एकरी एक लाखापर्यंत खर्च केला आहे. यापुढे तोडणीसाठी लागणारी मजुरी ही एकरी ३० ते ४० हजार रुपये होणार आहे. अशामध्ये बाजारभाव कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

सध्या फुलांच्या बाजारपेठेत मंदी असल्याने शेतकऱ्यांच्या फुलांना दहा ते पंधरा रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे. यामध्ये क्रेट पाठविण्याचे भाडे तसेच इतर खर्च पकडता हातात काही शिल्लक राहत नाही. उलट तोडणीसाठी लागणाऱ्या मजुरीसाठी पदरमोड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

बाजारपेठेत मंदी; प्रतिकिलो १० रुपये दर

खडकी (ता. आंबेगाव) येथील फूल उत्पादक शेतकरी दत्ताशेठ हगवणे म्हणाले, की मी चार एकर क्षेत्रात पिवळ्या गोंड्याची लागवड केली असून, त्यासाठी चार लाख रुपयांहून अधिक खर्च आला आहे, पहिलाच तोडणीचा दिवस असून दीडशे-दोनशे क्रेट माल निघणार आहे.

परंतु बाजारपेठेत मंदी असल्याने प्रतिकिलो फुलांना दहा रुपये असा दर मिळत आहे. यामध्ये बाजारात पाठविण्याचा खर्च सोडून मजुरी अंगावर पडणार आहे. परंतु एक आठ ते दहा दिवसांत लग्नसराईला जोरदार सुरुवात झाल्यानंतर तसेच मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यावर फुलांचे दर वाढतील असा विश्वास आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Agricultural Council: कृषी परिषदेला मिळेना पूर्णवेळ संचालक

Ajit Pawar: इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो; पवार

Crop Loss Compensation: पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू ः अजित पवार

Maharashtra Sugar Industry: वारेमाप ‘एफआरपी’ची स्पर्धा,आर्थिक बेशिस्त थांबवा

Mahatma Phule Agricultural University: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या यंत्रांना पेटंट

SCROLL FOR NEXT