Marigold Flower Rate : परभणीत झेंडूला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची निराशा

Flower Market : शुक्रवारी (ता.१) दुपारी झेंडूचे दर प्रतिकिलो ४० ते ६० रुपये होते. अपेक्षित दर न मिळाल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली.
Marigold Flower
Marigold FlowerAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : शहरातील विविध ठिकाणच्या बाजारामध्ये झेंडूची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. शुक्रवारी (ता.१) दुपारी झेंडूचे दर प्रतिकिलो ४० ते ६० रुपये होते. अपेक्षित दर न मिळाल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली.

परभणी येथील गांधीपार्क, वसमत रस्ता, जिंतूर रस्ता आदी ठिकाणच्या बाजारात परभणी जिल्ह्यातील विविध तालुके तसेच हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, वसमत आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडू विक्रीसाठी आणला होता.

Marigold Flower
Marigold Rate : दीपोत्सवात झेंडूचा भाव वधारला

गुरुवारी (ता.३१) रात्रीपासून अनेक शेतकरी झेंडू घेऊन आले. गुरुवारी प्रतिकिलो ७० ते ८० रुपये किलो दर होते. परंतु शुक्रवारी (ता.१) सकाळी झेंडूची आणखी आवक झाल्यामुळे दर गडगडले. यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टी, सततचा पाऊस तसेच ऑक्टोबर महिन्यातील मान्सून्नोत्तर पाऊस यामुळे झेंडू उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला.

Marigold Flower
Marigold Farming : कृषी पदवीधर शेतकऱ्याने घेतले झेंडूचे दर्जेदार उत्पादन

करपा पडल्यामुळे झेंडूची प्रत खालावली. सुकळी (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील शेतकरी अमरजित सिरसाट म्हणाले, की दसऱ्याला शेतातून ४० रुपये किलो दराने थेट शेतातून झेंडू विक्री केला. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला झेंडूची आवक कमी राहील, त्यामुळे प्रतिकिलो १०० रुपयापर्यंत दर मिळतील या अपेक्षेने परभणी येथे झेंडू विक्रीस आणला.

मिरखेल (ता.परभणी) येथील शेतकरी संभाजी गायकवाड म्हणाले, की यंदा पावसामुळे झेंडू फुलांचे नुकसान झाले, परंतु आवक जास्त झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाले नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com