Devendra Fadanvis Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Issue : मराठवाड्याचा पाणी प्रश्‍न शासनाच्या आदेशानंतरही कायम

Water Issue Update : ‘‘मराठवाड्यातील सिंचन विकास व मागासलेपणा दूर व्हावा यासाठी योजनांसह शासन आदेश राज्याचे मुख्यमंत्री असताना आपण निर्गमित केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : ‘‘मराठवाड्यातील सिंचन विकास व मागासलेपणा दूर व्हावा यासाठी योजनांसह शासन आदेश राज्याचे मुख्यमंत्री असताना आपण निर्गमित केले. परंतु नंतरच्या काळात वॉटर ग्रीड व कोकणातील पाणी स्थलांतराबाबत कोणतीही ठोस पावले उचलली न गेल्यामुळे मराठवाड्यासाठी पाणी स्थलांतर, सिंचन विकास व मराठवाड्यातील सिंचन अनुशेषाबाबत प्रश्‍न कायम आहेत,’’ अशी खंत मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केली.

महाराष्ट्र सिंचन आयोगाच्या मापदंडानुसार मराठवाड्यातील २६० टीएमसी पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नेमके काय करावे यासाठीच्या उपाययोजनांची जंत्रीच मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बुधवारी (ता. ३१) मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत मांडण्यात आली.

जलसंपदा मंत्र्यांना मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नाची जाणीव करून देण्यासाठी मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान व मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या (मसिआ) माध्यमातून मंत्री अतुल सावे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यानंतर बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, मंत्री अतुल सावे व आमदार संजय शिरसाठ यांच्यासह मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंकरराव नागरे, उपाध्यक्ष अनिल पाटील, सचिव रमाकांत पुलकुंडवार, सदस्य सर्जेराव वाघ, जयरिंग हिरे, अरुण घाटे, महेंद्र वडगावकर आधी या बैठकीत प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.

महाराष्ट्र सिंचन आयोग १९९९ यांनी ठरविलेल्या मापदंडानुसार (३००० घनमीटर प्रति हेक्टर) मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठीचे सादरीकरण मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नागरे यांनी केले. राज्याचा जलआराखडा तयार करणे, मराठवाड्यात वॉटर ग्रीड योजना राबविणे आणि कोकणातून १६८ टीएमसीपैकी १५५ टीएमसी पाणी दुष्काळी मराठवाड्यात वळविण्यासंदर्भात २०१९ मध्ये शासन निर्णय झाला. समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार ३१ ऑक्टोबरला जायकवाडीच्या वरच्या भागातील प्रकल्पातून पाणी सोडणे अपेक्षित आहे. मात्र न्यायालयात गेल्याशिवाय किंवा लढा उभारल्याशिवाय पाणी सोडले जात नाही, असे जलसमृद्धी प्रतिष्ठानच्या वतीने मांडण्यात आले.

यावर, ‘‘यापुढे असा प्रश्‍न उद्‍भवणार नाही. तसेच वॉटर ग्रीडसह मराठवाड्याचा पाणी प्रश्‍न सुटावा यासाठी सरकारही सकारात्मक व आग्रही आहे,’’ असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी बैठकीत दिली असल्याची माहिती आहे.मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावर सरकार गंभीरतेने व सकारात्मकतेने काम करत असल्याचे जाणवले. अर्थात, मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनीही शासन दरबारी पक्षभेद विसरून पाठपुरावा करावा. पाठपुरावा करणाऱ्यांना आम्ही तांत्रिक सहकार्य करू.
डॉ. शंकर नागरे, अध्यक्ष, मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान
मराठवाड्याचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी केलेली मांडणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतली आहे. सरकार पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी सकारात्मक आहे.
अतुल सावे, मंत्री, गृहनिर्माण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT