Biogas Project
Biogas Projectagrowon

Biogas Project : बायोगॅस प्रकल्पातून पुणेकरांना मिळणार आता शूद्ध पाणी, तरूणाचे नवं संशोधन

Biogas Project Technology : बायोगॅस प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञान वापरून दररोज एक हजार ते एक लाख लिटर पाण्याची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान पुण्यातील शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी विकसित केले आहे.
Published on

Pune Biogas Project Research : बायोगॅस प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञान वापरून दररोज एक हजार ते एक लाख लिटर पाण्याची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान पुण्यातील शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी विकसित केले आहे. आपल्या संशोधनाची माहिती देताना मुखर्जी म्हणाले, की ओल्या कचऱ्यापासून खत आणि ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येतात. मात्र याच प्रकल्पामधून उर्जेबरोबरच आपल्याला पाणीही मिळू शकते.

बायोगॅस एक हायड्रोकार्बन आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असतो. आपण जेव्हा बायोगॅस पेटवतो, तेव्हा ठरावीक तापमानानंतर यातील हायड्रोजन ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन पाणी तयार होते व वाफेच्या रूपात वर उडून जाते. अशा वेळी चिमणीच्या तोंडाशी हे वॉटर रिकव्हरी युनिट वापरल्यास पिण्यायोग्य पाणी मिळू शकते. एक किलो बायोगॅसपासून दोन लिटर पाणी तयार होऊ शकते, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी अभियंता 'व्हीजीटीआय'मधील रोहिणी खारकर, स्थापत्य अभियंता श्रुणाली आपटे, 'सीओईपी'मधील अभियंता सुभाष गुप्ते, आयआयटी मुंबईचे वैमानिक अभियंता मिलिंद पालकर, डाऊ केमिकलचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. मनोज खारकर उपस्थित होते.

'ग्रामीण भागातील प्रश्न सुटेल'

बायोगॅस प्रकल्पातून शुद्ध पाणी मिळते हे एक सिद्ध झालेले तंत्रज्ञान असून, उत्तर अमेरिकेत ४८ वर्षांपूर्वी ते वापरण्यात आले आहे. तसेच २००३ मध्ये तंत्रज्ञानाच्या शोधासाठी मला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे.

Biogas Project
Leopards In Maharashtra : राज्यात बिबट्यांची संख्या वाढली, महाराष्ट्राचा कितवा नंबर

'नॅशनल बायोगॅस मॅनेजमेंट प्रोग्रॉम' या योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात १० लाख बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत. त्यापैकी काही प्रकल्प सुरू देखील झाले आहेत.

मात्र आगामी प्रकल्प उभारताना जर सरकारने हे वॉटर रिकव्हरी युनिट त्यात बसविल्यास ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच हे उपक्रम तयार करण्यासाठी उद्योग उभा केल्यास ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देखील उपलब्ध होईल. शिवाय उपकरणाला देखभालीची गरज नाही, असे मुखर्जी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com