Water Issue : पावसाळ्यातही अंबडमध्ये ४१ गावे तहानलेलीच; सत्तेचाळीस टँकर सुरू

Water Shortage : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र, तरीही अंबड तालुक्यातील १३८ गावांपैकी ४१ गाव, वाडी, वस्ती, तांड्यावरील तहान भागविण्यासाठी ४७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Jalna News :पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र, तरीही अंबड तालुक्यातील १३८ गावांपैकी ४१ गाव, वाडी, वस्ती, तांड्यावरील तहान भागविण्यासाठी ४७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

अंबड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या मागणीवरून तहसील कार्यालयाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे टँकर व विहीर अधिग्रहणासाठी मुदतवाढ मागितली होती. विहीर, पाझर तलाव, ओढे, नदी, नाले भर पावसाळ्यात कोरडेठाक पडले आहेत. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटत आले आहेत.

Water Shortage
Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ३८ टीएमसी उपयुक्त पाणी

मात्र, अद्यापपर्यंत दमदार पाऊस न झाल्याने जलस्रोत कोरडेठाक आहेत. यामुळे गाव, शेतशिवारात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यामुळे ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालक पुरते भयभीत आहेत. मात्र, अशा परिस्थितीमध्ये टँकर शिवाय आता पर्याय उरलेला नाही.

Water Shortage
Water Scarcity : जत, आटपाडी तालुक्यांतील ४४ गावांना टँकरने पाणीपुरवठा

बनगाव, टाका, दहिगव्हाण खु., रामनगर, बनटाकळी, झिरपी, किनगाववाडी, कौचलवडी, नांदी, ढालसखेडा, रामगव्हाण, डोमेगाव, कुक्कडगाव, किनगाव, भिवंडी बोडखा, मठजळगाव, कासारवाडी, राहुवाडी, चिंचखेड, वसंतनगर, जोगेश्वरवाडी, दुधपुरी, विठ्ठलवाडी, दाढेगाव, मठतांडा, बक्षाची वाडी, मार्डी, वाघलखेडा, धनगर पिंपळगाव, पारनेर, धाकलगाव, बेलगाव, बारसवाडा, पावसेपांगरी, दोदडगाव, दुनगाव, शहापूर, रुई, पराडा, रोहिलागड याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुक्यातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावरील ग्रामस्थांकडून तहान भागविण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण व टँकर सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. यामुळे पंचायत समितीकडून विहीर अधिग्रहण, तसेच टँकरला मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव आला होता. सदरील प्रस्ताव मंजुरीसाठी उपविभागीय कार्यालयाकडे पाठविल्यानंतर त्याला त्यांच्याकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
चंद्रकांत शेळके, तहसीलदार अंबड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com