Market Bulletin: सोयाबीन हमीभावाच्या खालीसोयाबीनच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. सध्या बाजारात वेगाने घडामोडी घडत आहेत. त्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. बाजारातील सोयाबीनची आवकही कमीच आहे. तरीही सोयाबीनचा भाव स्थिरावला आहे. सोयाबीन सध्या बाजारात सराकरी ४ हजार ८०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनची बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस आवक कमीचदेशातील बाजारात सध्या कापसाची आवक कमीच आहे. कापसाला उठावही चांगला आहे. मात्र सीसीआयची कापूस विक्री आणि कापूस खरेदी बंद करण्याच्या निर्णयामुळे कापसाच्या भावावर दबाव आला आहे. सीसीआयने कापसाचे भाव कमी करून विक्री सुरु केली आहे. यामुळे कापसाचा भाव कमी झालेला आहे. सध्या बाजारात कापूस सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विक्री होत आहे. कापसाची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. मात्र सीसीआयच्या कापूस विक्रीचा दरावर दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Chana Procurement: हरभरा उत्पादकांसाठी महत्वाचा निर्णय; राज्यात ७.६१ लाख टन हरभरा खरेदीला मान्यता.हरभरा दबावातचदेशातील बाजारात हरभरा भाव दबावातच आहेत. सध्या हरभरा हमीभावापेक्षा कमी भावात विकला जात आहे. यंदा सरकारने हरभऱ्याला ५ हजार ८७५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण प्रत्यक्ष बाजारात मिळणारा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ९०० रुपयाने कमी आहे. हरभऱ्याची आयाततही वाढलेली आहे. हरभऱ्याची सध्या म्यानमार आणि ऑस्ट्रेलियातून आयात होत आहे. आयात हरभराही हमीभावापेक्षा स्वस्त आहे. यामुळे देशातील भाव ४ हजार ८०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभऱ्याचा भाव पुढील काही आठवडे दबावातच राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Papaya Price: खानदेशात पपईची आवक नीचांकी स्थितीत.वांगी आवक सुधारलीराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून वांग्याची आवक सुधारली आहे. याचा परिणाम दरावरही दिसून येत आहे. वांग्याला सध्या लग्न सराई आणि समारंभामुळे मागणीही चांगली आहे. पण आवकेचा दबाव काहीसा वाढल्याने दरात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. सध्या बाजारात वांगी सरासरी २ हजार ते २५०० रुपयाने विकली जात आहे. पुढील काही दिवस बाजारातील वांगी आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही काहीसे दबावात राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..लिंबावा उठावउन्हाचा चटका आणि उकाडा वाढत असतान लिंबालाही उठाव मिळत आहे. राज्यातील लिंबाची आवक मर्यादीतच आहे. यंदा सरासरीपेक्षा सध्याची आवक कमी आहे, असे व्यापारी सांगत आहेत. केवळ मुंबई आणि पुणे बाजारात लिंबाची आवक १०० क्विंटलपेक्षा अधिक आहे. तर इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. सध्या लिंबाला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजारांचा भाव मिळत आहे. लिंबाची आवक पुढील काळाही सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे. तर उन्हाचा चटका वाढल्याने मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंबाला चांगला दर राहू शकतो, असा अंदाज लिंबू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.