Book Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review : जगणं नव्याने जगताना...

Jagan Navyane Jagtana Book : एखाद्या आव्हानाच्या डोळ्याला डोळा भिडवून त्याच्या समोर निर्भयपणे उभे राहण्याची ताकद निसर्गाने प्रत्येक माणसाला दिलेली आहे?

Team Agrowon

वंदना अत्रे

Book Update :

पुस्तकाचे नाव : जगणं नव्याने जगताना : कॅन्सर योद्ध्यांचा प्रेरणादायी प्रवास

शब्दांकन : ऐश्‍वर्या तानाजीराव भोसले

प्रकाशक : विंग्स पब्लिकेशन इंटरनॅशनल, इंदूर

किंमत : ४९९ रु.

एखाद्या आव्हानाच्या डोळ्याला डोळा भिडवून त्याच्या समोर निर्भयपणे उभे राहण्याची ताकद निसर्गाने प्रत्येक माणसाला दिलेली आहे? मुळात माणसाला आपल्यात असलेल्या या सामर्थ्याची ओळख होते आणि वापरता येते तरी कशी? हिमतीचा हा हातात आलेला धागा सुटतो तेव्हा काय होते? या आणि अशा प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अनेकांनी आपापल्या परीने केला आहे. कर्करोग (कॅन्सर) म्हटले, की डोळ्यासमोर उभा राहतो साक्षात मृत्यू. त्याच्या आव्हानाला सामोऱ्या जाताना आलेल्या यशापयशाच्या कहाण्या अनेकांनी शब्दबद्ध केल्या आहेत. त्यातून जाणवत राहते ती माणसाची विजिगीषू वृत्ती. अशाच लढाऊ सत्यकथा ‘जगणे नव्याने जगताना या पुस्तकातून ऐश्‍वर्या तानाजी भोसले यांनी संपादन - संकलनातून आपल्यासमोर मांडल्या आहेत.

अनुभव लिहिणाऱ्यांमध्ये बहुतांशी सामान्य स्त्रियांचा समावेश असला तरी त्यांच्या आजाराशी दिलेल्या लढ्यातून त्यांचे तेजस्वी कणखर रूप आपल्यापुढे येते. स्वतःला कर्करोग झाल्यानंतर वारकरी परंपरेतून आलेल्या शहाणपणाच्या संस्काराला धीराची जोड देत सामोऱ्या जाणाऱ्या ऐश्‍वर्याने स्वतः लिहितानाच अन्य अशाच सहप्रवाशांनाही लिहिते केले. या अनुभवांचे एक कोलाज म्हणजेच हे पुस्तक. प्रत्येकाची पार्श्‍वभूमी अगदी वेगळी. बाळ काळणे यांच्यासारखा सर्पमित्र कॅन्सरचे निदान समजल्यानंतरही एका घरातील धोकादायक साप पकडण्याची जबाबदारी पार पाडूनच आपल्या स्वतःच्या उपचाराला जातो.

शस्त्रक्रियेनंतर आलेल्या दिव्यांगतेनंतर मूळ काम न सोडता कॅन्सर जागृतीला वाहून घेतो. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी रक्ताचा कॅन्सर नावाचा कठोर भिडू सिद्धी भिडेच्या जीवनात दाखल झाला. महिन्याला एक केमो इंजेक्शन, त्यासोबतच्या वेदना आणि दुष्परिणाम सोसत शालेय जीवनात लखलखीत यश मिळवते. पुढे हाच भिडू मेंदूच्या कॅन्सरच्या रूपात दाखल झाला, तरी आपल्या डॉक्टर होण्याच्या स्वप्न सिद्धीने कधीही मागे पडू दिले नाही.

कोरोना काळात उपचार घेण्याचे आव्हान पेलणाऱ्या जयश्री गुमास्ते, स्तनातील गाठीकडे दुर्लक्ष करताना एकदम समोर आलेले निदान स्वीकारताना प्रगल्भ होत गेलेल्या कल्पना गुप्ते, दोन वेळेला कॅन्सर उपचारांच्या चक्रातून जाऊनही स्वतःवरील विश्‍वास कायम ठेवणाऱ्या प्रज्ञा इनामदार या आणि अशा अनेक मैत्रिणीनी आपले अनुभव अगदी निःसंकोचपणे लिहिले आहेत. कॅन्सरने आपल्याला शहाणे आणि सकारात्मक केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. या पुस्तकातून कॅन्सरग्रस्तांचे अनुभवच येतात असे नाही, तर या आजारातील आहार ते पुनर्वसनासाठी करावे लागणारे प्रयत्न, या काळात समुपदेशनाची होणारी मदत आणि कॅन्सरचे बदलते स्वरूप यावर तज्ज्ञांचे लेखही घेतलेले आहेत.

या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणाऱ्या डॉ. शुचिता नांदापूरकर -फडके या स्त्रियांना मानसिक बळ देणारी तज्ज्ञ म्हणूनही पुढाकार घेतात. आयुष्याचे ‘इकेगाई’ उद्दिष्ट शोधणाऱ्या ऐश्‍वर्याचे मनोगत आणि प्रत्येकाची तिनेच काढलेले छायाचित्रे यामुळे पुस्तकाची संग्राह्यता नक्कीच वाढली आहे. काही जणांना वाटेल की आमचा कॅन्सरशी काय संबंध आणि का वाचायचे हे पुस्तक? तर सकारात्मकतेचे सगुण सुंदर रूप तुम्हालाही मोहून टाकते, जगण्याची व लढण्याची प्रेरणा देते म्हणून!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात उसाची ३१ हजार हेक्टरवर लागवड

Cashew Subsidy : काजू अनुदान अर्ज भरण्यासाठी राहिले केवळ चार दिवस

NCP Sharad Pawar Candidate 3rd List : कृषिमंत्र्यांच्या विरोधात शरद पवारांनी शिलेदार मैदानात उतरवला; परळीतून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी

Water Storage : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक बंधारे भरले; भूजल पातळी वाढण्याची शक्यता

Agriculture Theft : शिवारातून कापसासह केळी, शेती यंत्रणांची चोरी

SCROLL FOR NEXT