Gokul Milk Kolhapur : जनावरांवर होणार आयुर्वेदिक उपचार, ‘गोकुळ’चा हर्बल पशुपूरक प्रकल्प, काय आहे वैशिष्ट्य

Ayurvedic Treatment Animals : नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणंद (एन.डी.डी.बी) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू होत आहे. प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन ४०० किलो इतकी आहे.
gokul milk kolhapur
गोकुळ दूध संघ करणार जनावरांवर आयुर्वेदिक उपचारagrowon
Published on
Updated on

Gokul Milk Ayurvedic Treatment Animals : महाराष्ट्रातील पहिला हर्बल पशुपूरक प्रकल्प जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने सुरू करण्यात आला. संघाच्या गडमुडशिंगी येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात हा प्रकल्प उभारला आहे. त्याचे उद्‌घाटन सोमवारी (ता. २२) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तर आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणंद (एन.डी.डी.बी) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू होत आहे. प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन ४०० किलो इतकी आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या प्रकल्पामधून सहा प्रकारच्या हर्बल पशुपूरक (हर्बल औषधे) उत्पादनांची निर्मिती होणार आहे. उत्पादित होणाऱ्या हर्बल पशुपूरकांचा वापर संघाच्या सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत दूध उत्पादकांच्या जनावरांच्या विविध आजारांचा प्रतिबंध व उपचारांसाठी करण्याचे नियोजन आहे.

नैसर्गिकपणे सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पती व स्वयंपाकातील मसाल्यांच्या पदार्थांचा वापर यामध्ये केला आहे. यामुळे जनावरांच्या स्तनदाह, कासेला सूज येणे, सडाला चिराभेगा, चामखिळ, अपचन, गाभण न राहणे यांसह अन्य आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार होणार आहेत. सभासदांनी याचा लाभा घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले आहे.

gokul milk kolhapur
Milk Tea : महिनाभर दुधाचा चहा बंद केल्यास शरिरावर काय परिणाम होईल?

पारंपरिक घरगुती औषधोपचार पद्धतीला चालना देणे.

दूध उत्पादकांना खात्रीशीर गुणवत्तेची हर्बल औषधे किफायतशीर दरात उपलब्ध करणे.

जनावरांतील विविध आजारांवर उपचाराकरिता होणाऱ्या अॅलोपॅथिक औषधाच्या अति वापरामुळे जनावरांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी करणे.

स्वच्छ आणि प्रतिजैवक (अँटिबायोटिक) अंश विरहित दूध उत्पादन करण्यास प्रोत्साहन देणे.

अॅलोपॅथिक औषधांचा खर्च कमी होणार आहे.

ही औषधे नैसर्गिक असल्यामुळे जनावरांच्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत.

जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास चालना मिळणार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com