Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : राज्यघटनेच्या चौकटीत मराठा आरक्षण हवे : अ‍ॅड. खेडेकर

Adv Khedekar : मराठा समाजाला भारतीय राज्यघटना व सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत आरक्षण मिळायला हवे, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Yavatmal News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे लढा देत असून, त्यांचे स्वागत आहे. मराठा समाजाला भारतीय राज्यघटना व सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत आरक्षण मिळायला हवे, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले. जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने यवतमाळ येथे आले असता, सोमवारी (ता.२२) येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

समविचारी परिवर्तनवादी संघटनांसोबत चर्चा करून कृतिशील कार्यक्रम देण्यासाठी १६ ते ३० जानेवारी या कालावधीत जनसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यासह देशात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रांत अस्थिरतेसह भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिकीकरणाच्या नावाखाली धक्कादायक बदल झाले आहेत. शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची स्थिती आहे. बहुजन समाजातील मुलांना हक्काचे प्राथमिक शिक्षण मिळणे गरजेचे असताना शाळा बंद होत आहेत.

सरकारी नोकऱ्या बंद झाल्या असून, काही ठिकाणी होत असलेल्या पदभरतीत पारदर्शकता राहिली नाही. संवैधानिक पदे असंवैधानिक मार्गाने भरले जात असल्याकडे प्रा. खेडेकर यांनी लक्ष वेधले. राज्यात पूर्वी बंधुभाव सलोख्याचे वातावरण होते.

यवतमाळ-वाशीमवर संभाजी ब्रिगेडचा दावा

संभाजी ब्रिगेड व शिवसेना (ठाकरे) यांच्यात युती झाली आहे. हिंगोली, बुलडाणा, यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा प्रस्ताव दिला आहे. ३० डिसेंबरला प्राथमिक चर्चा झाल्याचे प्रा. खेडेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे यवतमाळ-वाशीम लोकसभेचा प्रस्ताव पुढे केल्याने या मतदारसंघात पुन्हा एका दावेदार पक्षाची वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT