Maratha Reservation Survey : मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणास जालन्यात प्रारंभ

Jalna Reservation Survey : मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणासाठी जालना जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
Maratha Reservation Survey
Maratha Reservation SurveyAgrowon
Published on
Updated on

Jalna News : राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणासाठी जालना जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

या सर्वेक्षणासाठी २ हजार ९११ प्रगणक व १९६ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. मंगळवार (ता २३) पासून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे.

Maratha Reservation Survey
Maratha Reservation : मराठा सर्वेक्षणासाठी १५४ प्रश्न

सर्वेक्षण हे गोखले इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या यूजर फ्रेंडली मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील सर्वेक्षण अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.

Maratha Reservation Survey
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षणासाठी प्रशासन सज्ज

सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

सर्वेक्षणासाठी तालुकास्तरावर तहसीलदार हे नोडल अधिकारी व नायब तहसीलदार यांना सहायक नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ३१ जानेवारी पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना सर्व नोडल अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अशा प्रकारे सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

जालन्यातील तालुकानिहाय प्रगणक, पर्यवेक्षक

तालुका प्रगणक पर्यवेक्षक

जालना २९२ २१

अंबड ३४५ २३

भोकरदन ६१३ ४१

जाफराबाद २७९ १९

मंठा ३३८ २३

बदनापूर २६९ १८

घनसावंगी ४८३ ३२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com