Manoj Jarange Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election : लोकसभेसाठी मराठा समाज अपक्ष उमेदवार उभे करणार

Maratha Independent candidate for Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत मराठा समाज इतर समाजाबरोबर गावागावांत चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा समाज बांधवांनी मनोज जरागे यांच्याशी केली.

Team Agrowon

Jalna News : लोकसभा निवडणुकीत मराठा समाज इतर समाजाबरोबर गावागावांत चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा समाज बांधवांनी मनोज जरागे यांच्याशी केली. अंतरवाली सराटी येथे रविवारी (ता.२४) मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजाची निर्णायक बैठक झाली.

या बैठकीला राज्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना श्री जरांगे म्हणाले, ‘‘मराठे गाफील राहिले पहिजे, ही सरकारची भूमिका आहे. शासनाला अनेक वेळा संधी दिली. वेळ दिला. उपयोग झाला नाही. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. समाजाचे आंदोलन झाले.

राज्यात ५७ लाख नोंदी मिळाल्या. आज प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज लोक करत आहेत, मात्र त्याला विलंब लावला जातो आहे. समिती काय करते कळत नाही. गुन्हे वापस घेतले नाही, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. सत्तेचा गैरवापर सुरू केला. दडपशाही सहन केली जाणार नाही,’’ अशा शब्दात जरांगे यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री, गृहमंत्री हे समाजाला वेड्यात काढत आहेत. दहा टक्के आरक्षण समाजाला मान्य नसल्याचे या वेळी हात उंच करून समाजाने सांगितले.

आमच्या व्याख्येप्रमाणे सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी. तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. राजकारण माझा मार्ग नाही. जन आंदोलनावर माझा विश्वास आहे. अनेक उमेदवार उभे केले तर मतांची विभागणी होईल. त्यापेक्षा अपक्ष म्हणून एकच उमेदवार देण्यासाठी या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला, असेही मनोज जरांगे म्हणाले.

बैठकीतील निर्णय

मराठा समाज सर्व धर्मातील नागरिकांना विश्वासात घेऊन एकच अपक्ष उमेदवार देणार.

गावागावांत बैठका घेऊन उमेदवार चर्चा करून ठरवावा.

आरक्षणासाठी ज्यांनी विरोध केला त्यांच्या सभेला न जाण्याचे आवाहन करण्यात आले.

अंतरवाली सराटी येथे ३० मार्चला उमेदवारी जाहीर करणार.

अंतिम निर्णय व विराट सभेचे ठिकाण व वेळ ३० तारखेला अंतरवाली सराटी येथे जाहीर करण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर

Eknath Shinde: एकनाथ शिंदे नाराज? रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत धुसफुस ?

Khandesh Water Crisis : पावसाअभावी प्रकल्पांतील आवक अल्प

Farmer's Jal Samadhi Protest : युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात गोदापात्रात आंदोलन

Pm Surya Ghar Yojana : ‘सूर्यघर’चा जिल्ह्यातील ८५३३ ग्राहकांना लाभ

SCROLL FOR NEXT