Chief Minister Eknath Shinde : मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी केली जाईल; दूध का दूध... होईल; मुख्यमंत्री शिंदे विरोधकांवर बरसले

Chief Minister Shinde On SIT : मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात भूमिका मांडली. त्यांनी यावेळी विरोधकांवरही जोरदार टीका केली.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Pune News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासदंर्भात केलेल्या वक्तव्यावरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरागेंच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश सरकरला दिले. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच जरांगेंचा बोलविता धनी कोण आहे, हे शोधून काढले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत या विषयावर आपले मत मांडले. यावेळी त्यांनी कोणालाही आपली पातळी बाहेर जाऊन बोलता येणार नाही. कायदा सगळ्यांसाठी एकच असून मुख्यमंत्री देखील कायद्यापेक्षा मोठा नाही. त्यामुळे जरांगे यांची चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे.

शिंदे म्हणाले की, कोणत्याही समाजाला धक्का न लावता सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र यानंतर हे आरक्षण टिकणार नाही, असा सूर विरोधकांकडून काढला जात आहे. यापूर्वी राज्यात मराठा आरक्षणावरून मोठ मोठी आंदोलने झाली. पण ती शांततेत करण्यात आली. जरांगे वेळोवेळी ज्या मागण्या करत होते, त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. इतिहासात पहिल्यांदाच तीन तीन निवृत्त न्यायाधीश मराठा आरक्षणावर काम करत होते. तरीही जरांगे यांनी वेळोवेळी आपल्या भूमिका बदलल्या, असा हल्लाबोल शिंदे यांनी केला आहे.

Chief Minister Eknath Shinde
Manoj Jarange Patil : पोटदुखीने जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणावर ठाम

तसेच इतकी वर्षे मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती, तेव्हा आरक्षण का देण्यात आले नाही; मराठा समाज हा मागास आहे, हे माहिती असतानाही आरक्षण का दिले गेले नाही, त्यांना कोणी वंचित ठेवले, असे सवाल उपस्थित करून शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

आपण खोटी आश्वासन देत नाही. शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि ती पूर्ण देखील केली. याआधी देखील फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही ते उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात टीकवले. मात्र आमचे ते सरकार पडल्यावर काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Chief Minister Eknath Shinde
Manoj Jarange Patil Hunger Strike : उपचार घेणार की नाही, भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे जरांगे यांना निर्देश

जरांगे यांच्या आंदोलनावेळी कोणताच प्रोटोकॉल न पाळता मी तेथे गेलो. पण उपमुख्यमंत्र्यांवर आणि माझ्यावरही त्यांनी टीका केली. फडणवीस यांच्यावर एकेरी टीका करण्यात आली. त्यावरूनच मी ही म्हणालो की, ती राजकीय भाषा आहे. सध्या राज्यातील जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. सरकार कोणालाही खूश करण्यासाठी दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. बीडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले, त्याचा सगळा अहवाल पोलिसांकडे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार हातावर हात ठेवून बसणार नाही. कायदा सगळ्यांसाठी एकच आहे. आता ज्या गोष्टी समोर येत आहेत. ज्या पद्धतीने जरागें बोलत आहेत. ते योग्य नाहीत. त्यावर सरकार बोलणारच. तसेच जरागेंचा बोलविता धनी कोण, हे ही पाहावं लागेल, असा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला आहे.

फक्त मराठाच नाही तर दुसरा समाज असता तरीही त्यांच्या आरक्षणासाठी मी शपथ घेतली असती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंगनाचे घर तोडले, नारायण राणे यांना ताटावरून उठवले; पण आम्ही कधी सुडबूद्धीने वागलो नाही. आता सत्य बाहेर येण्यासाठी, दूध का दूध होण्यासाठी, एसआयटी स्थापन केली जाईल. मराठा आंदोलन आणि जरांगे यांची चौकशी केली जाईल. यासाठी विरोधकांनी देखील सरकारच्या मागे उभे रहावे. हे आरक्षण मराठा समाजाच्या हितासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे एकमताने दिलेल्या आरक्षणावर कोणी बोलू नये, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना सुनावले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com