Solar Ghar Yojana : पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत नागरिकांनी घरावर सोलर पॅनेल बसवले आणि तयार होणारी वीज महावितरणला दिली की त्या नागरिकांना वीज बिलामध्ये सूट मिळते. या योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, नेट मिटरिंगसाठी बसवले जाणारे मिटर वेळेत न मिळणे, मिटरच्या चाचणीसाठी विलंब होणे, अशा कारणांमुळे ग्राहकांना विनाकारण मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपती तटपते म्हणाले की, "प्रधानमंत्री सौर घर योजनेसाठीचे बहुतांश काम हे खासगी कंपनी किंवा व्हेंडर करतो. मीटरही वेळेत दिले जाते. नावातील दुरुस्ती किंवा अन्य तक्रारींचीही तत्काळ दखल घेऊन त्यावर कार्यवाही होते. या संदर्भात ग्राहकांची काही तक्रार असेल तर त्यांनी संबंधित विभागाशी संपर्क करावा. त्यांच्या शंकांचे तत्काळ निरसन करता येईल". असे तटपते यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तत्काळ मंजुरी मिळते. तसेच अनुदानही वेळेत जमा होते. मात्र, महावितरणकडून काही बाबींसाठी विलंब होत आहे. सौरऊर्जेची निर्मिती वाढावी, यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजना बनवण्यात आली. या अंतर्गत ग्राहकांनी घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवायचे आहे. त्यातून जी वीज तयार होईल, ती महावितरणला द्यायची.
आपण जेवढी युनिट वीज महावितरणला देऊ तेवढे युनिट वीज आपण वापरली तर त्याच्या बिलामध्ये सूट दिली जाते. यासाठी केंद्र सरकारने बनवलेल्या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. येथे सर्व माहिती भरली की, तत्काळ योजनेतील सहभागाला मंजुरी मिळते. त्यानंतर आपण खासगी सोलर पैनल बसविणाऱ्या कंपनीकडून घरावर सौर पॅनल बसवावे लागते. त्यानंतर आपण किती युनिटसाठी योजना घेत आहोत त्यानुसार अनुदान मिळते.
तसेच महावितरणला वीज दिल्यामुळे प्रतिमहिना येणाऱ्या बिलामध्ये सवलत मिळते. यामध्ये नेट मिटरिंगसाठी जे मीटर बसवले जाते ते महावितरणकडून देण्यात येते आणि महावितरणचे वायरमन हे मीटर बसवतात. मात्र, यासाठी बऱ्याच चकरा माराव्या लागतात. काहीवेळा वीज बिलावरील नावात काही चुका असतात. या दुरुस्तीलाही बराच वेळ लागतो. त्यामुळे अनुदान जमा होण्यासही विलंब होत आहे. केंद्र सरकार सौरऊर्जेला चालना देण्यासाठी प्रभावी योजना राबवत असताना अंमलबजावणीमधील अडथळ्यांमुळे मात्र वीज ग्राहकांना त्रास सहन कराव लागत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.